Vadval Samaj - one family

Latest Vadval News And Events

About Vadval Samaj

वाडवळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या समाजाचे मूळ नाव सोमवंशी क्षत्रिय असे आहे. जे उत्तर कोकणात १०६० सालापासून असल्याचे दिसून येते. मुंबईच्या जन्मावर लिहिलेल्या पुस्तकांत या समाजाचा उल्लेख आढळतो. त्यापूर्वी हा समाज धारवाड प्रांतातील पालनपूर संस्थानात होता. पुढे संस्थानिक प्रतापबिंबाने मुंबई, ठाणे, पालघर जिंकले आणि माहीमला राजधानी बनवली. तिथे वसाहत निर्माण करण्यासाठी त्यांनी सोबत आणलेल्या ६६ कुळांच्या वसाहती विविध भागांत वसवल्या. त्यामध्ये इतर समाजासह सोमवंशी क्षत्रिय समाज मोठय़ा प्रमाणात होता. हा समाज मुख्यत्वाने पालघर जिल्ह्यत तसेच मुंबई उपनगरात वसला.

Vadval Blog