comment 3 Comments

गिर्यारोहक हर्षाली वर्तक चालली जपान मधील फुजी शिखर सर करायला

वसईतील वाडवळ हर्षाली वर्तक हि गिर्यारोहक तरुणी जपान मधील फुजी शिखर सर करणार आहे.
यासाठी ती येत्या ५ सप्टेंबर जपानकडे प्रस्थान करत आहे.जगातील चढाईसाठी सात धोकादायक शिखरांपैकी एक शिखर असलेल्या जपानमधील माऊंट फुजी येथे जाणारी ती भारतातील ८ गिर्यारोहकमध्ये एकमेव महिला असल्याने तिचे सर्व स्थरावरून कौतुक होत आहे.

समस्त सोमवंशी क्षत्रीय समाजोन्नती संघ वाडवळ समाजाकडुन हर्षालीस शुभेच्छा…

comment Add Comment

Vadval Photo Contest Winners

अभिनंदन

www.nachiketsave.com प्रस्तुत

वाडवळ फोटो📷 कॉन्टेस्ट

 स्पर्धेचे विजेते खालील प्रमाणे

पहिला विजेता

यश राजेंद्र सावे

शाखा – बोर्डी

दुसरा विजेता

हर्षाली वर्तक
शाखा – माडलई – वसई

तिसरा विजेता

निरज महेश पाटील
शाखा – माकुणसार

विजेताचे हार्दिक अभिनंदन…!!

सगळ्या सहभागी झालेल्या सदस्याचे आभार…!!!

comment Add Comment

हार्दिक अभिनंदन – विनम्र वसंत सावे

कु.विनम्र वसंत सावे, सावेवाडी, मुळगाव.C.A. ची परिक्षा उत्तीर्ण झाला बदल हार्दिक अभिनंदन…..!!!

विनम्रयास पुढील वाटचालीस शुभेच्छा.!!

 

comment Add Comment

वृक्षारोपण निमंत्रण

🌹वृक्षारोपण निमंत्रण🌹
🌲🌲🌴🌱🌴🌲🌲
सर्वांना माझा नमस्कार,
सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघ फंड ट्रस्टचे विद्यमान कार्यकारी विश्वस्त व लायन्स क्लबचे डिस्ट्रिक गवर्नर डाॅ. दिपक चौधरी यांचे विद्यमाने
दि इंटरनॅशनल असोसिएशन लायन्स क्लबतर्फे रविवार दिनांक १२।८।२०१८ रोजी सकाळी  ११.०० ते ०१.०० वाजताचे दरम्यान “वृक्षारोपणाचा”* कार्यक्रम सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघ संचालित केळवारोड येथील  लोकनेते  अण्णासाहेब वर्तक आरोग्यधाम व पुज्य पद्मश्री भाऊसाहेब वर्तक व श्रीमती इंदुताई वर्तक विश्रामधाम कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आला आहे. तरी आपण स्तुत्य अशा उपक्रमात सहभागी होऊन सहकार्य करावे, ही नम्र विनंती.
आपला,
अजय ठाकूर
अध्यक्ष,
सो. क्ष. स. संघ
🌱🌱🌱🌱🌱🌱
comment 9 Comments

हार्दिक अभिनंदन – राहुल सावे

‘सकाळ’ वर्धमान दिनानिमित्त ‘पोलिटिकली करेक्ट’ व्यंगचित्र प्रदर्शन कोल्हापूर येथे दिनांक ०१ ऑगस्ट २०१८ ते ०३ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी १० ते सायं. ०७ वाजेपर्यंत कै. बाबुराव पेंढारकर कलादालन, कोल्हापूर येथे भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनमध्ये माहीम गावातले व्यंगचित्रकार राहुल सावे ह्याचे हि व्यंगचित्रे प्रकाशित केले आहेत.

राहुल ह्यास हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा..!!

 

 

aman chaudhari
comment 12 Comments

अमन चौधरी – राष्ट्रीय प्रतिभा क्रिडा सेवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

५ व्या अखिल भारतीय प्रतिभा संमेलनात विरारच्या अमन चौधरीचा गौरव,देशभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी करणा-या १०० गुणवंतांचा गोव्यात सत्कार…..
कला, पर्यटन, सांस्कृतिक, साहित्य, सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रतिष्ठेचा मानला जाणारा साहित्य मानवसेवा परिषदेचा २०१८ या वर्षासाठीचा पुरस्कार रवींद्र भवन नाट्यगृह वास्को-गोवा येथे आयोजित ५ व्या अखिल भारतीय प्रतिभा संमेलनाच्या व्यासपीठावरून मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवारी प्रदान करण्यात आले.देशभरातील निवडक १०० प्रतिभावंतांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
गोवा – महाराष्ट्र अंतर्गत शासन मान्यता प्राप्त मानवसेवा विकास फाउंडेशन, कला पर्यटन सांस्कृतिक महोत्सव समिती, मानवसेवा साहित्य अकादमी महाराष्ट्र, कला सप्तसूर संस्था गोवा आणि जीवन ज्योती प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. राष्ट्रीय व राज्य स्तरीय पातळीवरील पुरस्कार विजेत्यांमध्ये गोमंतकीय सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक व पत्रकारितेसह इतर सर्वच क्षेत्रात विशेष कार्य करणा-यांचा गौरव करण्यात आला.
विरार येथे राहणारे अमन चौधरी आंतरराष्ट्रीय अॅथलेटीकपटू आहेत.राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अॅथलीट स्पर्धेत त्यांनी दैदिप्यमान कामगीरी केली आहे.गरीब व गरजू विद्यार्थी व खेळाडूंसाठी ते विनामूल्य खेळाचे प्रशिक्षण देतात. इंडिया मास्टर अॅथलेटीक्स ऑफ महाराष्ट्र या संघटनेचे ते सदस्य असून पालघर जिल्हा अॅथलेटीक्स असोसिएशनचे सहसचिव आहेत.अनेक पुरस्कार त्यांना मिळाले असून त्यात ठाणे जिल्हा पोलीस क्रिडा पुरस्कार,गोखले एज्युकेशन नाशिक क्रीडा पुरस्कार,शिवसन्मान सोहळा क्रिडा पुरस्कार तसेच स्थानिक पातळीवर अनेक पुरस्कार त्यांनी प्राप्त केले आहेत.त्यांच्या या उल्लेखनीय कामगीरीबद्दल त्यांना ‘राष्ट्रीय प्रतिभा क्रिडा सेवारत्न पुरस्काराने’सन्मानित करण्यात आले.

comment Add Comment

हार्दिक अभिनंदन – युगा चुरी

युगा अजित चुरी ( शाखा-चिंचणी) हिची चेन्नई येथे होणाऱ्या १९ वर्षाखालील मुलींच्या संघात (INDIA U – 19) क्रिकेट कॅम्पसाठी निवड झाली आहे.

युगा हीस खूप खूप शुभेच्छा !

sejal raut
comment 2 Comments

हार्दिक अभिनंदन – सेजल किरण राऊत

कु.सेजल किरण राऊत, राऊत आळी, चक्रेश्वर मंदिराजवळ, उमराळे, नालासोपारा (प) हिची १ ऑगस्ट २०१८ पासून चेन्नई येथे होणा-या १९ वर्षांखालील महिला क्रिकेट संघात (INDIA U – 19) क्रिकेट शिबिरासाठी निवड झाली आहे.

सेजल हीस खूप खूप शुभेच्छा !

comment 31 Comments

हार्दिक अभिनंदन

रिया सुरेंद्र चौधरी (शाखा – माहीम) हिची चेन्नई येथे होणाऱ्या १९ वर्षाखालील मुलींच्या संघात (INDIA U-19) क्रिकेट कॅम्पसाठी निवड झाली आहे.

रिया हीस पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

comment 3 Comments

चिराग चौधरी – आपल्या रक्तदानासाठी आम्ही मनापासून आभारी आहोत

बंगली येथील कार्डिनल ग्रेसीस हॉस्पिटल मधील एका रुग्णास O- negative गटाच्या रक्ताची गरज होती, त्यावेळी आपल्या समाजाचा सदस्य चिराग चौधरी ( शाखा – माकुणसार ) ह्याने हॉस्पिटल मध्ये जाऊन रक्त दान केले, आमच्या विनंतीला मान देऊन तू वेळेत वेळ काडून रक्त दान केलेस, त्यासाठी आम्ही सगळे तुझे मनापासून आभारी आहेत.

तुझ्या ह्या कार्याला मानाचा मुजरा …!

comment Add Comment

दु:खद निधन.

दु:खद निधन.
 कै.कामळाकर काळू पाटील,मथाणे यांचे आज दि.13/7/2018 रोजी निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा उद्या दि. 14/7/2018 त्यांच्या राहत्या घरून ( मथाणे) सकाळी 9-00 वाजता निघेल.
मीनल , विराज , दिपन यांचे वडील ..
comment 1 Comment

श्री. प्रफुल्ल_म्हात्रे (शाखा माहीम, नारळवाडी) यांची पश्चिम_रेल्वे तर्फे उपनगरीय रेल्वे सल्लागार समितीवर नेमणूक करण्यात आली आहे.

श्री. प्रफुल्ल_म्हात्रे (शाखा माहीम, नारळवाडी) यांची पश्चिम_रेल्वे तर्फे उपनगरीय रेल्वे सल्लागार समितीवर नेमणूक करण्यात आली आहे.
ह्या बद्दल हार्दिक अभिनंदन !!