comment 7 Comments

हार्दिक अभिनंदन – मयुरेश चुरी ह्याला स्टेट लेव्हल फोटोग्राफी स्पर्धेमध्ये द्वितीय पुरस्कार मिळाला

मयुरेश चुरी ह्याला शरद फेस्टिव्हल, स्टेट लेव्हल फोटोग्राफी स्पर्धेमध्ये द्वितीय पुरस्कार मिळाला.

मयुरेश ह्यास पुढील वाटचालीस शुभेच्छा💐💐

comment 3 Comments

स्वप्नील शशिकांत चौधरी, विरार पश्चिम ह्यांस मानाचा रेड डॉट पुरस्कार २०१८ मिळाला

श्री. स्वप्नील शशिकांत चौधरी, विरार पश्चिम ह्यांस मानाचा रेड डॉट पुरस्कार २०१८ मिळाला. हा पुरस्कार त्यांस सिंगापूर येथील रेड डॉट पुरस्कार सोहळयात दि. २८/०९/२०१८ रोजी प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार म्हणजे जागतिक डीझाइन क्षेत्रातील ऑस्करच म्हणावे लागेल. भारतातील(pharmaceutical) औषधोत्पादना संबंधित मशिनरी निर्मात्यांत हा पुरस्कार मिळविणारी स्वप्नील ह्यांची मशीन संकल्पना पहिलीच आहे. स्वप्नील ह्यांनी हा पुरस्कार मिळवून त्यांची कंपनी ACG Engineering आणि भारत देशाच्या शिरपेचात मानाचा तुराच खोवला आहे. आपल्या पालघर जिल्ह्यातून हा रेड डॉट पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच आहेत.

रेड डॉट म्हणजे डिझाइन आणि व्यवसायात सर्वोत्तम आहे असे प्रॉडक्ट. हि आंतरराष्ट्रीय डिझाइन स्पर्धा “रेड डॉट डिझाइन अवॉर्ड” ह्या नावाने आेळखली जाते.
रेड डॉट डिझाइन पुरस्कार हा आंतरराष्ट्रीय उत्पादन डिझाइन आणि डिज़ाइन संकल्पना (i.e. design concept) पुरस्कार आहे; जो जर्मनीतील एसेन मधील डिझाइन झेंट्रम नॉर्डहेन वेस्टफॅलेन मार्फत दिला जातो. उत्पादन डिझाइन, डिझाइन एजन्सी आणि डिझाइन संकल्पनां ह्या पुरस्कार श्रेणीत मोडतात. ही स्पर्धाच मुळी अश्यांसाठी आहे जे त्यांच्या व्यवसायाची रचना डिझाइनद्वारे वेगळे करू इच्छितात.

भेद निवड आणि सादरीकरणाच्या तत्त्वावर आधारित ह्या स्पर्धेतून उत्पादन डिझाइन, संचार डिझाइन आणि डिझाइन संकल्पनांमध्ये सक्षम तज्ञ / जूरीद्वारे उत्कृष्ट डिझाइनची निवड केली जाते.

जागतिक डिझाईन विश्वात सर्वोच्च असा बहुमान म्हणजे Red Dot Design Award.
जसे हाॅलीऊड चित्रपट सृष्टीत आॅस्कर हा सर्वोच्च बहुमान आहे.. त्याप्रमाणेच क्रिएटीव्ह डिझाईन क्षेत्रातला आॅस्कर म्हणजेच Red Dot Design Award. जगातील सगळ्यात खडतर व कठीण डिझाईन अवॉर्ड.. ज्यासाठी जगभरातील ५५ देशातील जवळजवळ ५६४० प्रवेशिकांन मधून फक्त ५% स्पर्धक विजेते ठरतात. १९५४ मध्ये स्थापित, हा पुरस्कार जगभरातल्या वर्षातील सर्वोत्तम उत्पादनांचे मूल्यांकन करतो. या वर्षी, ५५ देशांमधून या स्पर्धेला एकूण ५,६४० नोंदी मिळाल्या आणि निर्णायक निष्कर्षापर्यंत, रेड डॉटला २६५ डिझाइन संकल्पना देण्यात आल्या.
स्वप्निल ह्यांची संकल्पना ही जगातील २६५ संकल्पनांमधील एक ऊत्कुष्ठ विजेती संकल्पना ठरली.
स्वप्नील ह्यांनी त्यांचा चौधरी परीवार, त्यांचे गाव, त्यांचा समाज, महाराष्ट्र म्हणजेच पर्यायाने हिंदुस्थानचे नाव आज जागतीक पातळींवर उंचावले आहे. त्यांच्यावर सर्वच स्तरांतुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

sharvi save
comment 13 Comments

शर्वी सुहास सावे हिची U-19 महिला T/20 स्पर्धेत मुंबई संघातून निवड झाली आहे

कुमारी शर्वी सुहास सावे हिची कटक, भुवनेश्वर येथे होते असलेल्या T/20 स्पर्धेत मुंबई संघातून (under ninteen) निवड झाली आहे.
वयाच्या १५व्या वर्षी under ninteen संघात समावेश होणं खरचं उल्लेखनीय आहे…

क्रिकेट ग्राफ – http://www.cricketgraph.com/award-nomination/sharvi-saave-for-nataraj-pens-cricketgraph-womens-awards-2017-18/

शर्वी हिस पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..!💐💐👍

Data Credits – http://mumbaicricket.com/mca/news.php?PageIndex=1475

sagar patil
comment 18 Comments

हार्दिक अभिनंदन – सागर गिरीधर पाटील याची सोमवंशी क्षत्रिय समजोन्नती संघाच्या युवा समिती प्रमुखपदी निवड

माहीम शाखेतील श्री सागर गिरीधर पाटील याची सोमवंशी क्षत्रिय समजोन्नती संघाच्या युवा समिती प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन💐💐

सागर ह्यास अभिनंदन करण्यासाठी खालील कंमेंट बॉक्समध्ये शुभेच्छा देऊ शकतात.

comment Add Comment

९८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाची🌴 ९८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा🚻 रविवार, दिनांक १४ ऑक्टोबर २०१८ रोजी सकाळी ९:३० वाजता आण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिर सभागृह🏫, दादर , मुंबई ४०००२८ येथे संघाचे अध्यक्ष श्री अजय यशवंत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.

आपण या सभेस📜 उपस्थित राहावे ही विनंती.

comment 8 Comments

हर्षाली वर्तकने केलं जपानचे सर्वात उंच शिखर माऊंट फुजी सर…

जपानची माउंट. फुजी एक टोक्योपासून दक्षिणेकडे 100 किलोमीटर अंतरावर सक्रिय ज्वालामुखी आहे. हे जपान मधील सर्वात उंच शिखर आहे आणि 3,776 मीटर उंच आहे.

संपूर्ण वाडवळ समाज कडून हर्षालीचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..!!

comment 1 Comment

Riya Chaudhari, Yuga Churi and Sejal Raut selected for Womens U-19 practice matches at Guntur

रिया चौधरी (शाखा – माहीम), युगा चुरी ( शाखा-चिंचणी) आणि सेजल राऊत( उमराळे – नालासोपारा ) ह्यांची गुंटूर,आंध्रप्रदेश येथे होणाऱ्या महिला U-१९ सराव सामन्यासाठी निवड झाली आहे.

ह्यास पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

Source – http://mumbaicricket.com/mca/news.php?PageIndex=1456

comment Add Comment

मथाणे – उज्वल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कै सखाराम ,विष्णु व कै .विकास चौधरी स्मृती श्री गणेश सदन वास्तुचा उदघाटन सोहळा

|| श्री गणेशाय नम: ||

उज्ज्वल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे “कै. सखाराम, विष्णु व विकास चौधरी स्मृती – श्री गणेश सदन” वास्तुचा उदघाटन सोहळा मंगळवार दि. ११ सप्टें. २०१८ रोजी मथाणे(सफाळे) येथे संपन्न झाला.

कार्यक्रमाचे उदघाटक म्हणुन मा श्री. सुधिरजी पाटील डायरेक्टर विणा वर्ल्ड(मुंबई), प्रमुख अतिथी म्हणुन श्री दिपकजी चौधरी(जेष्ठ उद्योजक व गव्हर्नर – लायन्स क्लब ऑफ इंडिया) व श्री.अजयजी ठाकुर (अध्यक्ष – सो. क्ष. स. संघ), तसेच उज्ज्वल मंडळाचे प्रमुख सल्लागार व आधारस्तंभ मा. श्री. केसरीभाऊ पाटील व सौ. सुनीताताई पाटील(केसरी टुर्स) हे मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री प्रकाश वि. चौधरी यांनी भूषविले. स्वागताध्यक्ष म्हणुन श्री. अरविंद पाटील, मथाणे गावचे सरपंच श्री. महेश गो. पाटील व उज्ज्वल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. संतोष दा. पाटील, गणेशोत्सव मंडळाचे सस्थापक श्री. विजय चौधरी, श्री. हरिभाऊ पाटील व गावातील इतर मान्यवर उपस्थित होते.

या वास्तुसाठी श्री गणपत बा. चौधरी, श्री. विलास सखाराम चौधरी, श्री सुरेश सखाराम चौधरी, श्री. प्रकाश विष्णु चौधरी व श्री समिर मधुकर चौधरी यांनी जमिन विनामुल्य देणगी स्वरुपात दिली. कार्यक्रमाचे निवेदन सौ. हर्षला म्हात्रे (वेढी) यानी केले.

सदर वास्तुचे बांधकाम व निधी संकलनासाठी उज्ज्वल मंडळाच्या कार्यकर्त्यानी अथक परिश्रम घेतले.

comment 4 Comments

अभिनंदन – अमन चौधरी यांनी आशिया पेसिफिक मास्टर्स गेम २०१८ पेनांग मलेशिया येथे ४०० मीटर रिले रनिंग स्पर्धे मध्ये कांस्य पदक पटकावले आहे.

!!! हार्दिक अभिनंदन !!! 👏👏 💐💐

वसई येथील आपल्या समाज्याचे उत्कृष्ट धावपटू श्री. अमन चौधरी यांनी आशिया पेसिफिक मास्टर्स गेम २०१८ पेनांग मलेशिया येथे ४०० मीटर रिले रनिंग (४ x १०० मीटर) स्पर्धे मध्ये कांस्य पदक पटकावले आहे.

आशिया पेसिफिक मास्टर्स गेम २०१८ हि स्पर्धा दि. ७ ते २२ सप्टेंबर २०१८ ह्या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.
श्री. अमन चौधरी यांचे सोमवंशी क्षत्रीय समाजोन्नती संघ, वाडवळ-पाचकळशी समाजाकडुन त्रिवार अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा…!!! 💐💐💐

comment 1 Comment

अभिनंदन – शासकीय विभागीय जलतरण स्पर्धेत कृत्तिका नंदन वर्तक हिला द्वितीय क्रमांक आणि राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे

भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल धारावी, सायन येथे झालेल्या शालेय शासकीय विभागीय जलतरण स्पर्धेत १७ वर्षाखालील मुली या वयोगटात २०० मीटर फ्री स्टाईल या प्रकारात कु.कृत्तिका नंदन वर्तक हीने द्वितीय क्रमांक मिळविला.
1 ते 4 ऑक्टोबर 2018 , नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेसाठी तिची निवड झाली.

दि. 07/09/2018 , वसई विरार महानगरपालिके तर्फे महापौर श्री . रुपेश जाधव व सौ. प्रविणा हि. ठाकूर यांच्या हस्ते गुणवंत खेळाडूंचा सत्कार तसेच विशेष धनादेश देऊन प्रोत्साहन..सोबत राज्यस्तरीय जलतरणपटू म्हणून कृत्तिका नंदन वर्तक.

अर्जुन पुरस्कार विजेता , आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय जलतरणपट्टू वीरधवल खाडे सोबत कृत्तिका…😊

समस्त सोमवंशी क्षत्रीय समाजोन्नती संघ,वाडवळ समाजबांधवाकडून कृत्तिका नंदन वर्तक हिचे हार्दिक अभिनंदन..!

🏊🏻‍♀🏊🏻‍♀🏊🏻‍♀🏊🏻‍♀🏊🏻‍♀🏊🏻‍♀🏊🏻‍♀🏊🏻‍♀

comment Add Comment

बोर्डीचे भालचंद्र पाटील यांचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळच्या तांत्रिक सल्लागार पदी निवड

बोर्डीचे रहिवासी आणि मुंबई महापालिकेचे माजी उपायुक्त भालचंद्र पाटील यांची महाराष्ट्र राज्य प्रदूषण महा मंडळाचे तांत्रिक सल्लागार पदी निवड झाली आहे.

श्री भालचंद्र पाटील याना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा..!

MPCB Pdf file

comment 1 Comment

वसईतील दर्शना अनिल राऊत यांना २०१७-१८ चा आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार आज मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते देण्यात आला

वसईतील दर्शना अनिल राऊत यांना २०१७-१८ चा आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार आज मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते देण्यात आला.
मूंबई महापालिकेतर्फे महापालिका शाळेतील आर्दश शिक्षकांना विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात सन्मान सोहळ्यात बुधवारी पूरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.विशेष म्हणजे दर्शना राऊत यांना २०१५ साली बृहंमूंबई महानगरपालिकेचा क्रिडा गौरव पुरस्कार मिळाला होता.
समस्त सोमवंशी क्षत्रीय समाजोन्नती संघ,वाडवळ समाजबांधवाकडून दर्शना राऊत यांचे हार्दिक अभिनंदन.. .