गेल्या मोसमात यु मुंबा या प्रो कब्बडी संघात फिजिओ ची भूमिका यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर डॉ. नीरज विनोद चुरी(चिंचणी-शिवाजी चौक) याची भारताच्या राष्ट्रीय संघात निवड झाली आहे.
सध्या नीरज भारताच्या सोळा वर्षाखालील फुटबॉल संघाच्या फिजिओ म्हणून रुजू झाला आहे.
ह्या संघाचे ट्रेनिंग आता ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे आहे.
गेल्या मोसमात यु मुंबा चा स्टार सिद्धार्थ देसाई ला झालेल्या दुखपतीमधून सावरण्यासाठी नीरज ची फार मदत झाली आणि ह्याचा उल्लेख खुद्द सिद्धार्थ ने केला होता. त्यामुळेच त्याच्या कामगिरी चांगली प्रगती झाली.
आता सुध्दा नीरज ने १६ वर्षाखालील भारतीय संघाला तंदुरुस्त ठेऊन आशिया कप आणि फिफा वर्ल्ड कप साठी पात्र करण्याचे ध्येय बाळगले आहे. आणि त्यासाठी तो प्रचंड मेहनत घेत आहे.
लहानपणापासून भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याचे नीरजचे स्वप्न त्याने पूर्ण केले.
वाडवळ समजाकडून मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा