comment Add Comment
Posted on Last updated

तू नदी आहेस

तू नदी आहेस..
तू वाहत राहा,तू विस्तृत हो…
एकाजागी थांबून,पाण्याचं डबकं मात्र होऊ नकोस !

करशील पाषाणावरही मात तू
शोधशील नवी, स्वप्नांची वाट तू
तूच घडवशील नवी पिढी
कुशीत नांदतील तुझ्या सवंगडी !

झरा-धबधबा नाव घेत
तू वाहत आहेस जोमाने
शीतल, कोमल, तरल ,निर्झर…
सारेच शब्द, तुझ्यापुढे फिके !

जाता तू , डोंगराच्या पायथ्याशी..
वाट पाहते , तुझीच सावली
विचारतेस तू , थांबलेल्या प्रवाहाला..
का बरं तू , त्या समुद्राला घाबरलीस ?

तू नदी आहेस…
तू वाहत राहा,तू विस्तृत हो…
कोणा ऐऱ्या-गैऱ्याचे, भय मात्र बाळगू नकोस !

असेल तो, अथांग-विस्तिर्ण सागर
पण त्याला सुध्दा,वाहत्या नदीचाच लोभ !
म्हणून तर जलाची करुन आग
बरसतो तो पुन्हा,पाऊस होऊन !

– पर्णिका राऊत , चिंचणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *