comment Add Comment

सायकल सवारी – पर्यावरण रक्षणासाठी.. उत्तम आरोग्याच्या हितासाठी..!

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून माकुणसार, मथाणे, आणि केळवे परिसरातील तरुणांनी “सह्याद्री मित्र संस्थेच्या” अंतर्गत पर्यावरण रक्षणासाठी व निरोगी आरोग्याच्या हेतूने “सायकल सवारी” माकुणसार, रामबाग, ठाकूरपाडा आणि सफाळे या परिसरात आयोजित करण्यात आली होती. पर्यावरण जागृतीच्या या रॅलीला परिसरातील शालेय आणि महाविद्यालयिन विद्यार्थ्यांबरोबरच ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद लाभला होता.

सुसाट वेगात पळणाऱ्या दुचाकी तसेच चारचाकी वाहनांच्या धबडग्यात सायकली अभावानेच दिसतात. सायकलमुळे इंधनाची बचत होतेच, शिवाय प्रदूषणही होत नसले तरी आता सायकली फारशा दिसत नाही. याचाच विचार करत सायकल वापराच्या प्रचारार्थ आणि अनुषंगाने पर्यावरण, निसर्ग, इंधन बचत, जलसंवर्धन आणि दुर्गसंवर्धन ईत्यादींची प्रबोधन करणारी आगळेवेगळी “सायकल सवारी” परिसरातील जनमानसात लक्षवेधी ठरली.

“सायकल चालवा, प्रदूषण घालवा”, “सायकल चालवा.. पेट्रोल वाचवा..”, “इंधन नको, प्रदूषण नाही… सायकल सारखे वाहन नाही…”, “पर्यावरण टिकवा.. वसुंधरा वाचवा” असे विविध प्रकारची घोषवाक्य असलेली पोस्टर्स सायकलवर लावून सायकलस्वारांनी माकुणसार आणि सफाळे परिसरात पर्यावरणाबद्दल जागृती केली.

Content Credit –

Deepak Patil