comment 4 Comments

आठवतात का ते दिवस 

आठवतात का ते दिवस
लहानपणी कवलारु घरात आईवडीलान सोबत चार भांवड एकञ एका घरात आनंदाने राहत असत.
परतु आज मुलाच्या एका मोठ्या बंगल्या मध्ये आई वडीलाना राहायला जागा का पुरत नसत?
आठवतात का ते दिवस
लहानपणी बहिणी भावाच्या जिवकी प्राण असत.
परतु आज त्याच बहिणी दोन दिवसा साठी माहेरी आल्या की नकोश्या का होत असत ?
आठवतात का ते दिवस
लहानपणी एका ताटात बसुन जेवणारी एक मेकाची कापड घालणारी लेकर किती आनंदात असत.
परतु आज एका जमिनीच्या तुकड्या साठी एकमेकाच्या जिवावर का उठत असत?
आठवतात का ते दिवस
पुरवी एकञ कुंटूबाचा गाढा चालवणारी स्ञी 10/12 जणाचे काम करत कशी सुखी संसार माडंत असत.
परतु आज नवरा बायको दोघा समवेद 2 माणसाचे काम करायला का आजच्या पिढीला होत नसत?
आठवतात का ते दिवस
काबाड कष्ट करणारा आपला बाप आणि सकाळ पासुन घरात राबणारी आपली माय किती ही ञास झाला तरी राग राग न करता आपल्या मुलाना आनंदात ठेवत असत.
परतु आज कामावरुन दमुन आलेली मुल हयात माय बापावर राग राग का काढत असत?
        अँड. श्वेता चौधरी (विरार)
comment Add Comment

बाबा म्हणजे बाबा असतो

बाबा म्हणजे बाबा असतो
जो नऊ महिने आपल्या बाळाची
आतुरतेने वाट बघतो,
जो आपल्या मुलांसाठी
आयुष्यभर कष्ट करतो,
तो म्हणजे बाबा असतो.खरंच…
काही हवं असेल आणि बाबांना
सांगितलं तर ती गोष्ट लवकरात लवकर आणण्यासाठी धडपडणार बाबाच असतो,
खरंच, बाबा म्हणजे बाबा असतो…..
आपल्या मुलीला चांगल
सासर मिळावं म्हणून धडपणारा
पण बाबाच असतो,
खरंच बाबा म्हणजे बाबा असतो…
पण तोच बाबा मुलीचा
हात परक्याच्या हातात
देताना हुंदके देऊन रडतो,
खरंच बाबा म्हणजे बाबा असतो…..
पण तोच बाबा आपल्या मुलीला
सुखात बघून खूप सुखावतो
खरंच बाबा म्हणजे बाबा असतो….

रचना:- सौ तन्वी तन्वॆश म्हात्रे(T2)

comment 1 Comment

दादा

दादा…
दादा म्हणजे बाबाची सावली…
दादा म्हणजे आईची माया..
.दादा म्हणजे तो विश्वास
दादा म्हणजे आपुलकी
दादा म्हणजे बहिणीसोबत केलीये मस्ती
दादा म्हणजे बहिणीचा सुपरहिरो
दादा म्हणजे कशी दिसते विचारल्यावर मस्ती करणार दादा
दादा म्हणजे काहीतरी कुरापती काढून भांडण करणारा दादा
बहिणीच्या डोळ्यातले अश्रू पाहिल्यावर मायेने जवळ करणारा दादा.
बापानंतर वटवृक्षाची सावली देणारा दादा
आईनंतर मायेने जवळ घेणारा दादा.
..बहीण सासरी गेल्यावर एकटाच कोपऱ्यात बसून रडणारा. दादा…
पण सासरी जाताना सगळ्यांना आधार देणारा
दादा
मामा झाल्यावर आनंदाने नाचणारा दादा..

comment 4 Comments

आई

आई म्हणजे आपली ईश्वर
(आ=आपली,ई=ईश्वर)
आई म्हणजे माया
आई म्हणजे पहिला गुरु
आई म्हणजे पहिली सखी
आई म्हणजे दिशा
आई म्हणजे आदर्श
आई म्हणजे शीस्त
आई म्हणजे आधार
आई म्हणजे प्रेमळ जागा
आई म्हणजे सर्वस्व

रचना:-सौ तन्वी तन्वॆश म्हात्रे(T2)

comment 2 Comments

लोकनेते अण्णासाहेब वर्तक

माझ्या संबंध आयुष्यात वाईट वाटण्यासारखे काही घडले आहे का? शेवटपर्यंत मी सर्वांची सेवा करु शकलो. ह्यातच माझ्या व्रताची पूर्तता झाली.माझे जीवन सार्थकी लागले.

ठाणे जिल्ह्यातील लोकनेते अण्णासाहेब वर्तक ह्यांचे हे उद्गार त्यांच्या 65 व्या पुण्तिथीच्या वर्षातही प्रेरणादायक असेच वाटतात. अण्णासाहेबांचे सारे जीवन कर्मयोग राष्ट्राभिमान व अध्यात्मशीलता यावर उभे होते. जाज्वल्य निष्ठेने प्रेरित होऊन त्यांनी आपले सारे आयुष्य राष्ट्रोध्दारार्थ वाहिले. ते समाजसुधारक होते. आधुनिक युगातील भारतीय पंरपरेचे लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी त्यांनी आदर्श मानले.

शेती सुधारणा, शिक्षणप्रसार, स्त्रियांना समान हक्क, हुंडाबंदी, स्थानिक स्वराज्याचा श्रीगणेशा, स्वातंत्र्य संग्रामातील साधना,आदर्श ग्रामराज्याचे स्वप्न नागरिक विकासाची प्रगतीपर पावले.जिल्हा बोर्डाचे आर्थिक संवर्धन स्थानिक स्वराज्याचे प्रभावी कार्य,सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघ शक्ति दर्शन कार्य महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सोनेरी पान आहे. दारुबंदीच्या चळवळी बरोबर अण्णासाहेबांनी आपल्या सोमवंशी क्षत्रिय समाजा संघटनेचे कार्य हाती घेतले.ठाणे जिल्ह्यातील समाजाचे जीवन मुख्यतः शेती व बागायती ह्यावरच अवलंबून होते.समाजाच्या उन्नतीसाठी 1907 पासून बोर्डी चिंचणी व मुंबई येथील काही सुशिक्षित मंडळींनी प्रयत्न केले त्या प्रयत्नातून बोर्डी येथील ज्ञानवर्धक सभेच्या विद्यमाने 1907 साली चिंचणी येथे बोलावण्यात आलेल्या सो.क्ष.समाजाच्या परिषदेचा जन्म झाला. ही परिषद 27 जानेवारी 1907 रोजी चिंचणी येथील मोरेश्वर लक्ष्मण राऊत यांच्या अध्यक्षतेखाली भरली होती. ही परिषद म्हणजे समाजात होऊ घातलेल्या जागृतीचा पहिला हुंकार होता. बोर्डी, चिंचणी, तारापूर शिरगाव वगरे गावांतिल कार्यकर्त्यांनी दिनांक 9 मार्च 1919 रोजी चिंचणी येथे सभा घेऊन संघ स्थापन करण्याचे ठरविले. त्या सर्वांच्या मागे चिंचणीचे परशुराम धर्माजी चुरी,बोर्डीचे आत्मारामपंत सावे आणि विरारचे गोविंद धर्माजी वर्तक ऊर्फ अण्णासाहेब वर्तक हे प्रमुख होते. अण्णासाहेब वर्तकांसारख्या तरुण ध्येयवादी व अत्यंत कार्यक्षम अश्या कार्यकर्त्यांच्या अध्यक्षतेखाली प्रथमच स्वयंसेवक मंडळाची स्थापना दिनांक 28 मार्च 1920 रोजी करण्यात आली.परंतु योग्य मार्गदर्शन व संघटना ह्यांच्या अभावी हे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाहीत.समाजभूषण आत्मारामपंत सावे ह्यांच्या सल्ल्यावरुन ह्या मंडळींनी अण्णासाहेबांची भेट घेतली.समाज सुधारण्यासाठी अण्णासाहेबांची विचारपूर्वक बनलेली प्रगल्भ मते ऐकून त्यांना ह्या मंडळींकडून अधिक विचारविनिमयासाठी बोर्डी येथे बोलविण्यात आले.बोर्डी येथे झालेल्या ह्या सभेत समाजाच्या उन्नतीसाठी संघाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला व संघाच्या कार्याच्या दृष्टीने अण्णासाहेबांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 28 मार्च 1920 रोजी प्रथमच स्वयंसेवक मंडळाची स्थापना करण्यात आली. स्वयंसेवक मंडळाच्या सदस्यांनी गावागावातून दौरे काढले, व्याख्याने दिली व लोकजागृती केली. दिनांक 2 मे 1921 रोजी वसई येथे समाजाची परिषद भरविण्यात आली. समाजाची सर्वांगिण उन्नती घडवून आणण्याचे अण्णासाहेबांचे स्वप्न होते ह्या ध्येयाची मुहूर्तमेढ वसई येथील ह्या परिषदेत संघाच्या स्थापनेत रोवली जात होती.संघाची घटना हातात घेऊन अण्णासाहेब व्यासपिठावर उभे राहिले. त्यांचा प्रफुल्ल चेहरा आनंदाने उजळून गेला होता.आपले एक जिवीत स्वप्न साकार होत आहे ही भावना त्यांच्या शब्दाशब्दातून प्रकट होत होती.त्यांनी आपले भाषण संपविले आणि टाळ्यांच्या गजरात संघाच्या घटनेला परिषदेने मान्यता दिली. या घटनेप्रमाणे संघाच्या आश्रयदात्यांची वर्गणी रुपये 500 अशी ठेवण्यात आली.संघाच्या स्थापनेच्या वेळी श्री.भायजी जगू राऊत व अण्णासाहेब संघाचे आश्रयदाते झाले.1920 साली माकुणसार येथे प्राथमिक शाळा काढण्यात आली.या शाळेच्या स्थापनेसाठी अण्णासाहेबांनी आपली शंभर रुपयाची देणगी दिली.माकुणसार येथील शाळागृह बांधण्याकरीता संघाने मदत केली. त्यानंतर चटाळे येथे शाळा सुरु करण्यात आली. पुढे ह्या दोन्ही शाळा जिल्हा स्कूल बोर्डाने आपल्या ताब्यात घेतल्या. दातिवरे येथे शाळेच्या ईमारत फंडासाठी संघाने मदत केली.1922 साली गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना संघाकडून मदत देण्याचा नविन उपाम सुरु केला.1923 साली वार्षिक परीक्षेत पास होणार्या विद्यार्थी व विद्यार्थीनीस पारितोषिके वाटण्याचा उपाम सुरु केला.1921 च्या वसई येथील पहिल्या परिषदेनंतर माहीम व केळवे तेथे दोन परिषदा झाल्या.1924 साली बोर्डी येथे भरलेल्या चौथ्या परिषदेत शेतकी प्रदर्शनाची जोड देण्यात आली. भोर्डी येथे भरलेली ही परिषद संघाच्या इतिहासात चिरस्मरणिय झाली.1928 साली खुंतोडी वसई येथे भेरलेल्या परिषदेत निरनिराळ्या परीक्षेत उत्तीर्ण होणार्या समाजातील मुलींना कपडय़ाच्या रुपाने बक्षिसे वाटण्याचा उपाम संघाने सुरु केला व स्त्री शिक्षणाला अधिक जोराची चालना देण्यात आली.

अण्णासाहेबांनी आपल्या आजोबांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यासाठी संघाला रुपये 1000 ची देणगी दिली.1924 साली समाजभुषण तात्यासाहेब चुरी यांच्या संपादक परिपत्र ‘क्षात्रसेवक ठनावाचे त्रैमासिक सुरु करण्यात आले. अण्णासाहेब संपादक मंडळाचे प्रमुख सदस्य होते.विरार येथे 1931 साली सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाची 11 वी परिषद झाली.1031 सालच्या विरार येथील परिषदेच्यावेळी समाजाची दुसरी खानेसुमारी करण्यात आली अण्णासाहेबांना लोकल बोर्डाच्या अध्यक्षपदाचा मान मिळाल्याबद्दल ह्या परिषदेत त्यांचा जाहीर सत्कार करण्यात येऊन प्रेमाची स्मृति म्हणून त्यांना मानपत्र अर्पण करण्यात आले 1932 साली संघाचा निधी रुपये 22 000 झाला.1935 साली बोर्डी येथे समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी नूतन वसतिगृह स्थापण्यात आले.1935 साली चिंचणी येथे झालेल्या संघाच्या पंधराव्या वार्षिक परिषदेचे अण्णासाहेब अध्यक्ष होते.1936 साली ट्रस्टवत कायदेशिररित्या रजिस्टर करुन पुज्य अण्णासाहेब वर्तक श्री.तात्यासाहेब चुरी श्री.आत्मारामपंत सावे,श्री.नारायण भास्करजी म्हात्रे व श्री.बळवंत जगन्नाथ वर्तक ह्यांना संघाचे ट्रस्टी नेमण्यात आले.1940 साली ठाणे जिल्ह्यातील पहिल्या वादळाने समाजातिल गरीब शेतकर्यांचे फार नुकसान झाले. अण्णासाहेबांनी ह्या प्रसंगी संघाला देणगी दिली व त्या देणगीतून बी-भात खरेदी करण्यात येऊन समाजातील गरीब शेतकर्यांना वाटण्यात आले.

1945 साली रौप्य महोत्सवानिमित्त संघाचा निधी एक लाख रुपये जमविण्याचा संकल्प त्यांनी साकार केला. संघाच्या कार्याची मुहुर्तमेढ रोवण्यात आली.त्याच ठिकाणी वसई येथील भायजी जगू राऊत ह्यांच्या वाडीत रौप्यमहोत्सव समारंभ दिनांक 12 व 13 मे 1945 रोजी मोठय़ा थाटाने साजरा करण्यात आला. पंचविस वर्षाच्या ह्या काळात सोमवंशी क्षत्रिय समाजाची संघामार्फत स्पृहणिय प्रगती घडवून आणून समाजात राष्ट्रीय बाणा निर्माण करण्यात अण्णासाहेब यशस्वी झाले होते. अण्णासाहेब रौप्यमहोत्सव स्वागत मंडळाचे अध्यक्ष होते.संघाचा रौप्य महोत्सव अण्णासाहेबांच्या जीवनातील एक अत्यंत रोमहर्षक प्रसंग होता.समाजाची व संघाची ‘समाजदर्शन पुस्तिका प्रसिध्द करण्यातआली.शेती बागायतीचे व कला कौशल्याचे एक अत्यंत प्रेक्षणीय व सुंदर प्रदर्शन भरविण्यात आले होते.

1947 साली स्वातंत्र्यदिनोत्सवाच्या दिनी संघाला अण्णासाहेबांनी रु.1000 ची देणगी दिली.1950 साली येथील अमर हिंद मंडळाच्या जागेत चौकळशी पाचकळशी समाजातील निरनिराळ्या पोटजातीचे एकीकरण करण्याचा उद्देशाने ‘क्षात्रैक्य परिषदेची स्थापना करण्यात आली. अण्णासाहेबांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. 1921 सालच्या मे महिन्यात वसईच्या इतिहास प्रसिध्द किल्ल्याजवळील नारळी बागेत झालेल्या पहिल्या महाराष्ट्र प्रांतिक पिरषदेत महात्मा गांधीना टिळक स्वराज्य फंडासाठी अण्णासाहेबांनी एक हजार रुपयाची देणगी दिली.

1922 च्या डिसेंबर मध्येच गया येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनास प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले.1925 मध्ये स्वराज्यपक्षाच्या प्रचारार्थ देशबंधु दास ह्यांनी स्वराज्य विचारसरणीकरीता वसई येथे भेट दिली. अण्णासाहेबांनी ठाणे लिल्हा स्वराज्यपक्षातर्फे त्यांचा भव्य सत्कार करुन त्यांना ठाणे जिल्ह्यातर्फे थैली अर्पण करण्यात आली.1925 मध्ये नवीन महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेस कमिटीची पहिली सभा पालघर येथे भरविण्यात आली.ह्याच सभेत अण्णासाहेब महाराष्ट्र प्रांतिकचे एक खजिनदार म्हणून निवडले गेले.1930 मध्ये त्यांची महाराष्ट्र प्रांतिक उपाध्यक्षपदावर निवड झाली.त्याच साली ठाणे जिल्हा लोकलबोर्डाच्या निवडणुका स्वराज्यपक्षातर्फे लढविण्यात येऊन अण्णासाहेब जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष म्हणूननिवडून आले. आपल्या खेडेगावात व आपल्या शेतकरी समाजात राहून आपणास जी लोकसेवा करता येईल ती करावयाची हे अण्णासाहेबांचे ध्येय होते. पानवेलीवर संशोधन करण्यासाठी 1929 मध्ये त्यांनी संशोधन केंद्र उघडले व पानवेलीच्या रोगापासून वाचविण्याचे ज्ञान शेतकर्यांना उपलब्ध केले.1932 साली नारळीच्या झाडावर एक प्रकारची कीड पडे व झाडावरील झावळ्या आपोआप सुकु लागत.ह्या रोगासंबंधी शेतकर्यांना माहिती देण्यासाठी त्यांनी किटकशास्त्रज्ञांची नेमणू केली. शेतकी सभेची स्थापना करुन संस्थेचे प्रमुखपद आपणाकडे न घेता त्या पदावर भायजी जगू राऊत ह्यांच्यासारख्या प्रसिध्द शेतकर्याचीपुढारी म्हणून त्यांनी योजना केली.भायजी जगू यांच्या निधनानंतर अण्णासाहेब वसई शेतकी सभेचे अध्यक्ष झाले आणि 1946 साली पहिल्या खेर मंत्रीमंडळाचे स्थानिक स्वराज्य मंत्री पदावर स्थानापन्न होईपर्यंत म्हणजेच जवळजवळ 11 वर्षे त्यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिले.

1929 मध्ये वसई तालुक्यातील धारावाड विरुध्द अण्णासाहेबांनी संघटीतरित्या जी मोठी चळवळ केली तिला ठाणे जिल्ह्यात इतिहासात फार मोठे स्थान आहे.सरकारी धार्यात रुपयास कधी दोन आणे व कधी तीन याप्रमाणे सूट मिळाली जिल्ह्याच्या आरोग्याच्यादृष्टीने ऐन हंगामात हिवतापाने बेजार झालेल्या शेतकर्यासाठी त्यांनी दवाखाने उघडून औषोधोपचाराची व्यवस्था केली. 1927 साली वसई तालुक्याच्या बंदरपट्टीतील भागावर एक नविन संकट येऊ घातले होते.बी.ऍन्ड ची.आय.रेल्वेने या भागातील लोकांच्या सोयीसाठी वसई रेल्वे पुलाच्या उत्तरेकडील उमेळे गावापासून विरार पर्यंत रेल्वेचा एक फाटा बंदर पट्टीच्या भागातून काढण्याची एक योजना आखली होती.रेल्वेने आखणी केलेला मार्ग वसई आगराच्या अत्यंत सुपिक व समृध्द अश्या भागातून जात होता.त्यामुळे शेकडो एकर बागायतीजमिन रेल्वे मार्गाखाली जाणार होती.ऐवढेच नव्हे तर हा मार्ग ज्या बागायती वाडय़ांतून जाणार होता त्या वाडय़ांतील अनेक लोकांची घरेदारे जाऊन ह्या मार्गामुळे त्या वाडय़ांची चमत्कारीक विभागणी होणार होती कि रेल्वेसाठी केलेल्या मार्गाशिवाय बाकी राहिलेल्या लहान लहान तुकडय़ाचाही लागवडीच्यादृष्टीने उपयोग होणार नव्हता. अण्णासाहेबांच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी मोठी चळवळ उभारुन योजना कायमची रद्द केली.

उत्तर कोकणात म्हणजे ठाणे जिल्हा,पूर्वीचा मुंबई उपनगर जिल्हा व कुलाबा जिल्हा म्हणून होणार्या विभागात असून तीला खार जमिन असे म्हणतात.रंगाने लाल -राता तांदुळ त्यांनी ह्या खार जमिनीत पिकविला. शेतकर्याच्या प्रत्येक प्रश्नात त्यांनी लक्ष घालून शेतकर्यांसंबंधी अण्णासाहेबांनी जी आस्था दाखविली व वसई तालुक्यातील धारावाढी विरु जाटोची चळवळ करुन शेतकरी वर्गात त्यांनी जी मोठी जागृती निर्माण केली,त्यामुळे ते ठाणे जिल्ह्यातील शेतकर्याचे पुढारी म्हणून ओळखले जाऊ लागले.शेतकर्याच्या ह्या स्थानाची सरकारला अण्णासाहेब विषयी जाणीव होती. दिल्ली येथील इंपीरिअल कौन्सिल ऑफ ऍग्रीकल्चर रिसर्चच्या ‘राईस कमिटीवरठ मुंबई इलाख्यातील भातशेती करणार्या शेतकर्याचे प्रतिनिधी म्हणून मुंबई सरकारने त्यांचे नाव मध्यवर्ती सरकारकडे सुचविले.1936 सालच्या 4 फेब्रुवारी महिन्यात दोन वर्षाकरीता अण्णासाहेबांची ‘राईस कमिटीवर ठनेमणूक करण्यात आली. अण्णासाहेबांनी ह्या कमिटीपुढे, उत्तर कोकणातील भातशेतीचे काही प्रश्न ह्या विषयावर एक महत्वाचा प्रबंध वाचला. भातशेतीच्या सुधारणेबाबतीत त्यांनी सतत प्रयत्न केले. ठाणे जिल्ह्याच्या समुद्रालगतच्या पश्चिम भागात दिनांक 16 ऑक्टोबर 1940 रोजी एक भयंकर वादळ झाले. शेतकर्याप्रमाणेच समुद्रानजीक रहाणारे मच्छीमार लोकही उघडे पडले. ठाणे जिल्ह्यातील आपतग्रस्तांच्या साहाय्यासाठी मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वादळ संकट निवारण समितीकडून चाळीस हजाराची मदत मिळाली. त्यातच लोकल बोर्डाचे अध्यक्ष अण्णासाहेब ह्यांनी भर घालून आपादग्रस्तांना आर्थिक सहाय्य केले. किल्ले वसई द्विशत सावंत्ससरिक विजयदिनोत्सवानिमित्त रणसंग्रामाच्या धारातीर्त पतन पावलेल्या वीराच्या पुण्यस्मरणार्थ दिनांक 12 व 13 मे 1939 रोजी वसई किल्यात विजयोत्सव साजरा करण्यात आला.स्वागत समितीचे अध्यक्ष ह्या नात्याने अण्णासाहेबांनी उत्सव अपूर्व उत्साहाने पार पाडण्यास सहाय्य केले. अशा ह्या सरस्वती पुत्र अण्णासाहेबांची जीवनज्योत दिनांक 14 जुलै 1953 रोजी मालवली.त्यांच्या पवित्रस्मृतीस शतशः प्रणाम !

Content credit – http://www.allaboutvasaivirar.com/news/annasaheb-vartak-honor/

comment Add Comment

सुवर्णकन्या हिमा दास..


🔴
सुवर्णकन्या हिमा दास..

** काय धावलीस तू हिमा !! शेवटच्या 100 मी. मध्ये तुझा ग्रेस पाहण्यासारखा होता. तेव्हा तू धावत नव्हे तर झेपावत होतीस. वाऱ्याच्या नव्हे तर प्रकाशाच्या वेगाने धावलीस तू !!.. अप्रतिम..!! तो क्षण नजर आणि श्वास दोन्ही रोखून मी तुला पाहत होतो. तू फिनिश लाईन क्रॉस केलीस आणि आपोआप श्वासांनी एक जोरदार उसासा टाकला. टाळया आपसूक वाजल्या. “WOW” ही तर प्रतिक्षिप्त क्रियाच झाली. पण नजर काही तुझ्यावरून हटत नव्हती. ती तेव्हाच सरली जेव्हा पाठीवरून आपला राष्ट्रध्वज घेऊन तू प्रेक्षकांची शाब्बासकी मिळवत होतीस. त्याच क्षणी माझ्या डोळ्यात अभिमानाचे आनंदाश्रू तराळले आणि मगच तुझ्यावरून नजर सरली..
ऊर भरून आला जेव्हा तुझ्यासारखी सुवर्णकन्या गोल्ड मेडल पोडीयम वर उभी राहून गोल्ड मेडल घेत होतीस. कंठ दाटून आला अभिमानाने जेव्हा तू अटकेपार झेंडा रोवलास. आपले राष्ट्रगीत चालू झाले आणि तुझ्या डोळ्यातून ओघळलेले अभिमानाचे अश्रू पाहून गर्वाने माझी छाती फुलून गेली होती. देशाभिमान पुन्हा जागा झाला होता. रोमारोमात स्फुर्ती संचारली..पुन्हा पुन्हा हे असे क्षण यावे हीच इच्छा… राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीतामधे काय जादू आहे ना !!!!
हिमा !! तो दिवस नक्कीच दूर नाही. ऑलिम्पिक तुला खुणावतोय…. तुझ्या मेहेनतीला आणि समर्पणाला कडक सलाम.. तुझ्या आनंदाश्रू सकट आपला राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत पुन्हा आम्हा भारतीयांना पाहायचा-ऐकायचा आहे..
तुझ्या आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये तुला ज्यांनी ज्यांनी मोलाची साथ प्रोत्साहन दिले त्यांना खरोखर सलाम.. एका उभरत्या खेळाडूला किती पायऱ्या ,खाच खळग्यांना ओलांडून वर यावे लावते याची कल्पना सर्वांना नसते.. तुझ्या उज्वल भविष्यासाठी तुला लाख लाख शुभेच्छा..😊🙇🏻
– *नंदन वर्तक.*

comment Add Comment

फेसबुक फेवर…!!!

(बंडू काका आज हात पाय आदळतच घरात आले.)
बंडू काका :खायला काळ आणि भुईला भार झालीये कूचकामी कुठली….सतत “फेस भूक”,”फेस भूक” आणि “फेस भूक” बास्स झाल..कहरच झाला आता. आतल्या खोलीत बसलेली चिनू बाबांचा हा आकस्मिक राग पाहून आपण पकडलो गेलो या भीतीने अगदी कावरी-बावरी झाली.
एवढ्यात स्वयंपाक घरात भाजी चिरत बसलेल्या रमा काकू फिदी-फिदी हसत म्हणाल्या अहो काय हे…आधी नीट बोला तरी …”फेस भूक”,”फेस भूक” काय लावलय “फेसबुक” म्हणा “फेसबुक” ह्म्म्म.
बंडू काका : अग मी त्या फेसबुकबद्दल बोलत नाहीये … मी आपल्या म्हशीच्या सगुणेच्या नावाने लाखोल्या वाहतोय “दुध काही देत नाही उगीच आपल तोंडाला फेस आणून भूक लागल्याच ढोंग करते”.
आणि सुटकेचा निश्वास टाकीत चिनूने बंडू काकांची कमेंट लाईक करून त्यावर स्वतःची कमेंट दिली … हा… हा… हा.
– कु.भावेश वर्तक. ( काही चुका असल्यास जरूर निदर्शनास आणा,तुमच्या सूचनांचे स्वागत आहे. )

comment Add Comment

” तिथे रुपया वधारला “

काल प्रत्यक्ष अनुभवलं हेच ते वाक्य ” जब दस रुपये किसी गरीब को देने हो तब ज्यादा लगते है और वहा बीस रुपये वेटर को टिप में देने हो तो कम लगते है ” बरयाचदा वाचनात आल होत whatsapp,facebook,mail च्या माध्यमातून …. ( कदाचित तुमच्याही आल असेल )
काल संध्याकाळी ट्रेन मध्ये प्रवास करतांना एका स्टेशनवर एक “अंध जोडपे” चढल.सोबतीला त्याचं ८-९ वर्षाच पोर ,दोघांच्याही हातात काठी, मळके कपडे, एक कापडी पिशवी एवढाच काय तो त्यांचा ऐवज . काही वेळातच त्यांनी एक भक्तीगीत गात पैसे मागायला सुरवात केली त्या गाण्यातली आर्तता सहज कुणा निष्ठुराच्या काळजाला हात घालेल अशी होती ( खर पाहता आपण त्याला “भिक” मागणे असं म्हणतो पण पण त्या अंध व्यक्तीची दयनीय अवस्था पाहता मज तसं म्हणन्याच धाडस झाले नाही ) जो तो आपापल्यापरीने हाताला लागेल ते नाणे देत होता. मी हि ह्यास अपवाद नव्हतो. माझ्या समोरच्याचं सीटवर आसनस्थ झालेली “शुभ्र” पेहरावातली एक उच्चभ्रू गलेलठ्ठ व्यक्तीहि खिशातून नाण काढण्याचा छुपा प्रयत्न करीत होती अखेर अथक परिश्रमानंतर त्याच्या हातास एक नाण लागले पण त्याच्या दुर्दैवाने(… तस त्याच्या अविर्भावावरून दिसत होत) ते ५ रुपयाचे होते.अजून दोन -तीनदा हात खिशात हात घातल्यानंतर ह्या दानशूर कर्णाचे मतपरिवर्तन झाले बहुधा .तो पर्यंत ते अंध जोडपे काहीसं पूढे निघून गेलं होत पण ….पण आमच्या नजरा अजून ह्या गडगंज कुबेरावरच …. आणि डोक्यात अनेक विचारांचं काहूरत्यातलाच एक ” असा कितीसा फरक पडला असता ह्या सदगृहस्थाला जर का १ किंवा २ रुपयां ऐवजी ते पाचाच नाण त्यास दिल असत तरं … तिथे मग पटकन हा विचार मनास शिवून गेला …. ” जब दस रुपये किसी गरीब को देने हो तब ज्यादा लगते है… आणि मग मनातच म्हणत ट्रेनमधून उतरलो खरचं “इथे रुपया वधारला”.
-भावेश र. वर्तक. पालघर (माहीम).

rain
comment Add Comment

गॅलरीतला पाऊस…

तसा पावसात घराबाहेर पडायचा मला कंटाळाच..अगदीच काही महत्वाचं काम असेल तरच काय ते बाहेर निघायचं. कारण कितीही मोठी छत्री, रेनकोट घालून गेलं तरी शेवटी भिजायचं ते भिजतोच आपण. छत्री घेऊन गेलं म्हणजे नुसती आपल्या मनाची समजूत..जेव्हा पहिला पाऊस येतो तेव्हा मात्र त्या पावसात भिजण्यात खूप गंमत असते..वर्षाचे आठ नऊ महिने उन्हाच्या झळा सोसल्यावर आलेल्या पहिल्या पावसात चिंब भिजण्याची मजाच काही वेगळी असते.पण जसा पावसाचा जोर वाढत जातो तसा तो आपल्यासाठी किती महत्वाचा आहे, आपल्याला तो किती आवडतो अशा बाता मारणारे सुद्धा त्याला नंतर नावंचं ठेवतात.

आता हेच बघा ना…अगदी जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाच्या प्रवासाची बितंबातमी देणारे, पाऊस आल्यावर वातावरणात झालेला बदल अगदी रंगवून सांगणारे मीडिया वाले सुद्द्धा गेले दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे होणारी वाहतूककोंडी, रद्द झालेल्या लोकल ट्रेन्स, आणि ठप्प झालेले व्यवहार…याच बातम्या दाखवत आहेत.

म्हणूनच पावसाची मजा अनुभवण्यासाठी बाहेर पडण्यापेक्षा घरातच खिडकीत किंवा गॅलरीत बसून बाहेर धोधो कोसळणारा पाऊस बघणं मी नेहमीच पसंत करतो. पडत्या पावसात गरमागरम कॉफी पिण्याचा आनंद तो काय वर्णावा…

पावसाची अनेक रूपे बसल्या जागी आपल्याला अनुभवायला मिळतात. कधी फक्त हलकेच बारीक भुरभुरणारा, कधी सरळ उभा पडणाऱ्या पांढराशुभ्र जाडसर थेंबाचा, कधी आडवा तिडवा धो धो कोसळणारा, तर कधी सरकत पुढे पुढे जाणाऱ्या तिरक्या धारांचा पाऊस.

पडत्या पावसातसुद्धा उंच झाडावर चिडीचूप बसून राहीलेले बगळे, मध्येच पंखांवरचा पाणी झटकून पिसे फुलवून घरट्यात दडून बसणाऱ्या चिमण्या, बुलबुल…एखाद्या प्रामाणिक पहारेकऱ्याप्रमाणे झाडाच्या फांदीवर बसून टेहळणी करणारा खंड्या (kingfisher)…आडोसा पकडून अंग फुलवून झोपी गेलेली मनी..आणि पावसापासून बचाव करण्यासाठी कोणाच्या तरी टेरेस चा आसरा घेणारे कावळे…सर्वच जण आपापल्या परीने पाऊस एन्जॉय करत असतात.

लहान असताना जेव्हा खिडकीत बसायचो तेव्हा बाहेर कोसळणाऱ्या पावसाने खिडकीच्या काचा आतल्या बाजूने बाष्पामुळे धुरकट होत. त्याच्यावर बोटांनी रेघोट्या ओढायला फार मजा येई. त्या काचेवर आनंदी, दुःखी असे चेहरे काढायला नाहीतर आपली नाव लिहायला खूप भारी वाटायचं.. पावसाची जोराची झड खिडकीच्या आत आल्यावर उडणारे थंडगार तुषार मी दोन्ही हात पसरून चेहऱ्यावर घेई. खिडकीसमोर एखादी तिरकी जाणारी वायर लटकलेली असे. त्यावरून हे पावसाचे थेंब एकमेकांशी स्पर्धा करीत धावत जात.

कधी कधी घराबाहेर न पडता घरातच बसून बाहेर बरसणाऱ्या त्या पावसाकडे पाहिलं तरी आपल्याला एक अवर्णनीय सुख अनुभवायला मिळतं.. या लेखाच्या निमित्ताने सभोवताली अनुभवायला मिळालेल्या सर्व गोष्टी शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
– प्रतिक प्रवीण म्हात्रे

comment Add Comment

तिच्यातली “ती” Written by Vinit Vartak

तिच्यातली “ती”… विनीत वर्तक

आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यातून प्रवास करत असताना स्त्री ला अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून जाव लागत. एक मुलगी ते एक प्रेयसी मधून मग तो एक बायको ते एक आई असा होत जातो. ह्या सगळ्या भूमिकांमधून जाताना तिला आपल स्वकर्तुत्व हि सिद्ध कराव लागत असते किंवा ते करण्याच शिवधनुष्य ती पेलत असते. एका घरातून निघून दुसऱ्या घरात जाऊन स्वतःला तिकडे सिद्ध आणि त्या वातावरणात मिसळून घेण तस सोप्प कधीच नसते. आपली माणस कधी परकी होतात किंवा लांब होतात अचानक आयुष्याच्या एका टप्प्यावर आलेल्या नवीन माणसांना आपल मानून त्यांच्याशी आपल व्हावच लागते. ह्या सगळ्या बदलांचा परिणाम अथवा त्यांची व्याप्ती हि फक्त सामाजिक, शारीरिक इथवर नसून त्याचे परिणाम भावनिक आणि मानसिक पातळीवर हि खूप बदल करतात.

पुरुषाचा प्रवास तसा सोप्पा असतो. एक मुलगा ते एक बाप असा त्याचा प्रवास होत असला तरी त्याच घर ते त्याची माणस तशीच राहतात. शारीरिक बदल होत असले आणि त्याच्या वैचारिक संरचनेत अनेक बदल झाले तरी पुरुष हा शारीरिक पातळीवर आणि मानसिक पातळीवर तसा फारसा बदलत नाही. ह्याला करणे अनेक आहेत. स्त्री मात्र शारीरिक आणि मानसिक पातळीवर प्रचंड बदलांना सामोरी जाते. अगदी मासिक पाळी सुरु होण्यापासून ते मातृत्वाची चाहूल लागल्यावर किंवा ते अनुभवल्यावर हि मेनोपॉझ येई पर्यंत स्त्री च्या शरीरातील हार्मोन्स आणि मानसिक पातळीवर ह्या सगळ्याचा परिणाम प्रचंड होत असतो.

सुरवातीचे बदल मानसिक पातळीवर तितके जाणवत नाहीत कारण आयुष्यात अनेक रंग दिसत असतात. तारुण्याची आणि यौवनाची चाहूल लागलेली असते. पण आयुष्याच्या एका टप्प्यानंतर तिने सगळ अनुभवलेलं असते. मग अगदी ते शारीरक संबंध असो वा मातृत्व असो. जेव्हा आयुष्याचा उत्तरार्ध सुरु होतो तेव्हा मग ती तिच्यातल्या “ती” ला शोधायला निघते. आधीच्या आयुष्यात कधी कोणाच्या तरी सांगण्यावरून तर कधी सामाजिक बंधन म्हणून तर कधी असह्यतेने तर कधी जोशात निर्णय घेताना आपल्या इच्छांचा विचार खूप कमी वेळा ती करते. अनेकदा केला तरी त्या इच्छा कोणाच्या तरी पुढे दबल्या जातात. कधी घर, कधी नोकरी, कधी बायको तर कधी आई म्हणून येणाऱ्या जबाबदाऱ्या पूर्ण करताना आकाशात मोकळेपणे उडण्याच्या तिच्या महत्वकांक्षेला तिने स्वतःहून तर कधी अजून कोणीतरी तिलांजली दिलेली असते. पण ह्या सगळ्या गडबडीत तिच्यातली “ती” मात्र आत कुठेतरी गपचूप असते.

आयुष्याची पन्नाशी समोर आली कि ह्या टप्प्यावर सगळ्या बदलातून ती गेलेली असते. आता शेवटचा बदल हि हाकेच्या अंतरावर असतो. अश्या वेळी होणारे शारीरिक बदल म्हणजेच हॉरमनल चेंजेस मानसिक पातळीवर जास्ती प्रभावाने दिसून येतात. स्त्री आधीपासून भावनिक पातळीवर पुरुषापेक्षा एक पायरी वर असली तरी ह्या वयात तिची गरज अजून वाढते. पण तिच्यासोबत असणारा तिचा पुरुष तिकडेच असतो. कारण पुरुषाची भूक तीच असते न त्याच्या शाररीक परीस्थितीत कोणते बदल झालेले असतात. त्याचवेळी स्त्री ला अडकवून ठेवणाऱ्या बंधनातून पण ती बहुतांश मुक्त झालेली असते. मुल मोठी झालेली असतात. करियर, नोकरी व्यवस्थित चालू असते. घराला घरपण मिळालेलं असते पण त्याचवेळी इतके वर्ष दबलेली तिच्यातली “ती” मात्र शोधत असते तीच आकाश.

मेनोपॉझ सारख्या बदलात स्त्रीची मानसिक गरज प्रचंड वाढते. कुठेतरी वाटणारा एकटेपणा आणि सगळ असून सुद्धा काहीच नसल्याची भावना ह्या काळात खूप असते. अनेक इच्छा आयुष्याच्या प्रवासात दबलेल्या असतात. आता त्या खुणवत असतात. मग ते अगदी काहीही असू शकते. अगदी सायकल चालवण्यापासून ते नाटकात काम करे पर्यंत किंवा समुद्राच्या पाण्यात खोलवर जाण्यापासून ते एवरेस्ट शिखर आपलस करण्या पर्यंत. खूप अभावाने खूप कमी स्त्रीया तिच्यातील त्या “ती” ला ओळखतात आणि त्या इच्छा पूर्ण करतात. इच्छा किंवा महत्वाकांक्षा ह्या मोठ्या असतात अस पण काही नसते. अगदी कोणी शांतपणे आपल्याला ऐकून घ्यावं ते मोगऱ्याचा गजरा एकदा आपल्याला कोणीतरी माळून द्यावा इतकी माफक अपेक्षा पण त्या “ती” ची असू शकते.

खूप कमी पुरुष ह्या बदलांना समजून घेतात किंबहुना अनेक स्त्रियांना जिकडे हे खूप कमी वेळा समजते तिकडे पुरुषाबद्दल न बोललेलं बर. अनेकदा समजून पण तस कोणी मिळण हे हि महत्वाच असते. कारण इतके वर्ष सोबत राहून अंगवळणी पडलेल्या स्वभावासोबत हे सगळ शेअर करण नकोस होत. तर नवीन कोणासोबत हे सांगण म्हणजे दोन कड्यांवरून बोलण करण कारण स्त्री जिकडे भावनिक आधार शोधते तिकडे पुरुष गादीवर जाऊन पोचलेला असतो. त्यामुळे ह्या सगळ्या अवस्थेत पुन्हा एकदा तिच्यातल्या “ती” ला आत दबून टाकताना त्याचे परिणाम मात्र बाहेर दिसून येतात. कारण वय झालेलं तर असतेच पण जबाबदाऱ्या पूर्ण केल्यावर पण आपल आकाश न मिळाल्याची टोचणी जास्त खोलवर रुतते.

तिच्यातली “ती” हि एक फेज आहे. कोणाच्या आयुष्यात लवकर येते तर कोणाच्या आयुष्यात उशिरा पण येते मात्र नक्की. आपल आकाश शोधायचं कि लपवायचं हे जिच तिने ठरवायचं आणि ते हि कोणासोबत. कारण चांगल्या वाईट च्या सामाजिक कल्पना जितक्या सापेक्ष आहेत तितक्याच पुरुष सत्ताक सामाजिक बंधनावर बसवलेल्या आहेत. त्यामुळे त्याचे निर्णय हि तिने घ्यायला हवेत. सगळेच पुरुष गादीवर पोहचतात आणि सगळ्याच स्त्रिया भावनिक असतात अस अजिबात नाही. अपवाद हे सगळीकडे असतात आणि असतील पण एकूणच स्त्री आणि पुरुष ह्यांची जडणघडण लक्षात घेता ह्या मधली रेषा धूसर असते हे नक्की. तिच्यातली “ती” माझ्यामते एक सुंदर वेळ असते जेव्हा आपल्याला मनापासून वाटणाऱ्या किंवा खरच जाणवणाऱ्या गोष्टींना जगण्याची. शेवटी म्हणतात तस आयुष्य जगता यायला हव. किती क्षण जगले ह्यापेक्षा किती क्षण तुम्ही त्याला जोडले ह्यावर ते आनंदी आणि समाधानी होते. स्त्री च्या बाबतीत तिच्यातली “ती” ला अनुभवण म्हणजे एक सर्वोच्च समाधानाचा आनंद घेण.

comment Add Comment

ऑपरेशन मेघदूत written by Vinit Vartak

मिशन सिरीज…

भारतीय सैन्य म्हंटल कि समोर येते ती वीरश्री, पराक्रम आणि अतुच्य बलिदान. ह्यामुळेच आपण सगळे आज सुरक्षित आहोत, भारताच्या सीमा सुरक्षित आहेत. युद्ध असो वा शांतीकाळ दोन्ही वेळेला भारतीय सैन्याने आपल्या अतुलनीय पराक्रमाने अनेक मिशन यशस्वी पूर्ण केले आहेत. ह्यातील प्रत्येक मिशन हे त्याच्यामध्ये असणाऱ्या संकट, आखणी, पराक्रम ह्यासाठी विशेष आहे. मिशन हि सिरीज अश्याच काही भारतीय सेनेच्या मिशन बद्दल सांगणारी असेल. प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुलून येईल अशी गौरवगाथा समजून घेण माझ्या मते प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण असेल.

#मिशन_ भाग १ (ऑपरेशन मेघदूत)… विनीत वर्तक

जगातील सगळ्याच उंचावरची युद्धभूमी असा ज्याचा उल्लेख होतो ते सियाचीन ग्लेशिअर आज भारताचा भाग आहे. ७६ किलोमीटर लांबी असलेल आणि काराकोरम पर्वतराजीमधल सगळ्यात लांब तर जगातलं दुसऱ्या क्रमांकाच नॉन पोलर असलेल सियाचीन ग्लेशिअर समुद्रसपाटी पासून तब्बल ५७५३ मीटर (१८,८७५ फुट) उंचीवर आहे. ह्या उंचीमुळे इकडे वर्षभर अतिशय प्रतिकूल परिस्थिती असते. ह्यामुळेच १९८२ पर्यंत भारत किंवा पाकिस्तान ह्यापेकी कोणत्याही देशाच्या पोस्ट अथवा कोणत्याही देशाने ह्या भूभागावर आपला हक्क दाखवला नव्हता. १९८२ च्या आसपास भारताने आपल्या सैन्यातील लोकांना अति उंचीवर राहण्याचा सराव व्हावा म्हणून ट्रेनिंग देण्यास लडाख येथे सुरवात केली. भारताच्या ह्या सरावाची चाहूल पाकिस्तान ला लागली. त्यामुळे भारत काहीतरी करून सियाचीन ग्लेशियर वर आपल सैन्य उतरवण्याची तयारी करत आहे हे पाकिस्तान ने ओळखल व त्यांनी पण आपल्या सैन्याला तयार राहण्याचे आदेश दिले. पाकिस्तान ने आपल्या सैन्यासाठी बर्फात लागणाऱ्या विशिष्ठ कपड्यांची, बुटांची मागणी लंडन स्थित एका विक्रेत्याकडे केली. ज्याच्याकडून आर्टिक सर्कल ला जाण्यासाठी अस सामान पुरवल जात होत.

भारताला हि बातमी लंडन येथून कळताच पाकिस्तान च्या हालचालींची माहिती भारताला कळाली. सियाचीन ग्लेशियर वर ज्याची सत्ता तो ह्या भागातून जाणाऱ्या सिया ला (५५८९ मीटर ) , बेलाफोर्ड ला (५४५० मीटर ) , ग्योंग ला ( ५६८९ मीटर ) उंचीवर असणाऱ्या घाटरस्त्यांवर आपला हक्क गाजवू शकत होता. ह्या भागात वर्षभरात सरासरी १००० सेंटीमीटर बर्फ पडत असतो तर तपमान उणे ५० डिग्री सेल्सिअस च्या हि खाली जात असते. ह्या अश्या दुर्गम आणि प्रतिकूल भागावर हक्क भारतासाठी खूप महत्वाचा होता. पाकिस्तान १७ एप्रिल १९८४ च्या आसपास सियाचीन ग्लेशियर वर मोर्चा उघडणार असल्याची बातमी गुप्तचरांन कडून भारताला समजली. परिस्थितीच गांभीर्य लक्षात घेऊन तत्कालीन लेफ्टनंट जनरल प्रेम नाथ हून ह्यांच्या नेतृत्वाखाली भारताने ऑपरेशन मेघदूत ची आखणी केली. मेघदूत म्हणजे ढगांचा दूत ह्या ४ थ्या शतकातील कालिदासाच्या नाटकातील पात्रावर आधारित ह्या मोहिमेच नाव ठेवल गेल. कारण सियाचीन ग्लेशियर वर तेव्हा फक्त ढगांच राज्य होत.

ऑपरेशन मेघदूत च्या पहिल्या टप्प्यात भारतीय सैन्यातील सैनिकांना वायू दलाच्या एन १२, एन ३२ विमानांनी उंचीवर सोडण्यात आल. त्यानंतर एम आय १७ ,एम आय ८, हल चेतक ह्या हेलिकॉप्टर च्या साह्याने त्यांना अजून उंचीवर सोडण्यात आल. कुमाव रेजिमेंट ची पूर्ण बटालियन ( साधारण ३०० ते ८०० सैनिक) त्या सोबत लडाख स्काउट च्या काही तुकड्यांनी ब्रिगेडीअर डी.के. खन्ना ह्यांच्या नेतृत्वाखाली बर्फाने झाकलेला असा झोझिला पास चालत सर केला. पाकिस्तानी रडार न इतक्या मोठ्या सैन्य हालचालीची गोष्ट कळू नये म्हणून हि खबरदारी घेण्यात आली.

पहिल्या तुकडीतील लेफ्टनंट कर्नल आर.एस.संधू ह्यांच्या नेतृत्वाखालील टीम ने गेल्शिअर वरच्या महत्वाच्या ठिकाणी तिरंगा रोवला. कॅप्टन संजय कुलकर्णी ह्यांच्या नेतृत्वाखालील टीम ने बिलाफोंड ला वर तिरंगा फडकवला तर कॅप्टन पी.व्ही. यादव ह्यांच्या नेतृत्वाखाली टीम ने उरलेल्या साल्टरो रिज वर तिरंगा फडकवला. १३ एप्रिल पर्यंत भारताच्या ३०० जाबांज सैनिकांनी सियाचीन ग्लेशिअर च्या महत्वाच्या पासेस आणि शिखरांवर तिरंगा रोवून भारताचा हक्क प्रस्थापित केला होता. जेव्हा १७ एप्रिल ला पाकिस्तानी सैनिक ह्या भागात आले तेव्हा भारतीय सैनिकांनी त्यांना उत्तर देत पाकिस्तानी सैन्याला पिटाळून लावलं. १९८७ ला ग्योंग ला वर तिरंगा फडकवत भारताने ७६ किलोमीटर लांबीच्या आणि २६०० स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रफळ असणाऱ्या सियाचीन ग्लेशिअर वर आपला निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केल होत. पाकिस्तान ला लागून असणारी साल्टरो रिज खरे तर पाकिस्तान साठी खूप सहज अशी चढाई होती त्यातही पाकिस्तान ह्यावर कधीही आपला हक्क दाखवू शकला असता. भारताच्या बाजूने उंच पर्वतरांगा आणि प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा आपल्या सैनिकांमुळे भारत ऑपरेशन मेघधूत यशस्वी करू शकला. आज ह्या क्षणापर्यंत जगातल्या सगळ्यात उंचीवरच्या युद्धक्षेत्रा वर आपला तिरंगा डौलाने फडकतो आहे तो आपल्या सैनिकांमुळेच.

ह्या ऑपरेशन आणि ह्यातील लढाईत ३६ शूरवीर भारतीय सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले ज्यात जास्ती जीवितहानी इथल्या वातावरणामुळे झाली तर २०० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक मारले गेले. आजसुद्धा सियाचीन इथला पराभव पाकिस्तान विसरू शकत नाही. पाकिस्तान चा हक्क असलेला भूभाग भारताने नुसता काबीज नाही तर त्यावर एकछत्री अंमल प्रस्थापित केला. आजही पाकिस्तान साल्टरो रिज च्या आसपास पण नाही. जिकडे वातावरण अतिशय प्रतिकूल असते तिकडे भारतीय तिरंगा डौलाने फडकत असतो. आजही इकडे १५० च्या आसपास भारत पाकिस्तान मिळून पोस्ट असून दोन्हीकडून एकूण ३००० सैनिक ह्या भागात सरहद्दी च रक्षण करत असतात. भारताच्या बाजूने ह्या भागात जाण्यासाठी हवाई दलाच्या कुशल वैमानिकांवर अवलंबून रहावे लागते. अस असून सुद्धा पाकिस्तान हमला तर सोडाच पण ह्याच्या आसपास पण येण्याचा विचार करत नाही ह्यावरून भारतीय सैन्याचा दबदबा लक्षात घ्यावा.

सियाचीन इथली बना पोस्ट जगातली सगळ्यात उंचीवरची युद्ध पोस्ट असून ती प्रचंड उंचीवर म्हणजे २२,१४३ फुट (६७४९ मीटर ) उंचीवर आहे. भारताने आपले सैनिक सियाचीन च्या महत्वाच्या ठिकाणी पोहचवण्यासाठी इकडे जगातील सगळ्यात उंचीवरचा हेलीप्याड बांधला असून समुद्रसपाटीपासून तब्बल २१,००० फुट ( ६४०० मीटर ) उंचीवर आहे. इतक्या उंचीवर प्रचंड प्रतिकूल आणि मिनिटा मिनिटाला बदलणाऱ्या हवामानात हेलिकॉप्टर चालवणे किती कठीण असू शकते ह्याचा आपण इकडे बसून विचार करू शकत नाही. ह्या भागात विमान आणि हेलिकॉप्टर चालवणारे वैमानिक जगात सर्वोत्कृष्ठ समजले जातात. अमेरिका, इंग्लंड सारखे देश त्यांच्या वैमानिकांना ट्रेनिंग देण्यासाठी भारतात पाठवते ह्यावरून त्यांच्या कार्यक्षमतेचा अंदाज यावा. इकडे असलेली सोनम पोस्ट हि जगातील सर्वात उंचीवर सदैव सैनिक असलेली पोस्ट असून इथवर सैनिकांना नेण्यासाठी ध्रुव एम के ३ ह्या हेलिकॉप्टर चा वापर केला जातो. जगातील सगळ्यात उंचीवरचा टेलिफोन बूथ हि भारतीय सेनेने इकडे बांधला आहे.

बेनझीर भुत्तो ह्यांनी सियाचीन च्या पराभवानंतर पाकिस्तानी आर्मी ला उद्देशून सांगितल होत कि सियाचीन च रक्षण करता येत नाही तर हातात बांगड्या भरा. ऑपरेशन मेघदूत च यश किती लक्षणीय होत हे भुत्तोंच्या विधानावरून लक्षात आलच असेल. पण ह्या यशाची भारी किंमत भारताने हि मोजली आहे. गोळ्यांपेक्षा वातावरणाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे अनेक भारतीय सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सियाचीन ग्लेशिअर च आजही खडतर परिस्थितीत आपले भारतीय सैनिक जीवावर उदार होऊन रक्षण करत आहेत. जिकडे मानसिक, शारीरिक क्षमतेचा जिवंत राहण्यासाठी कस लागतो तिकडे आपला सैनिक पाठीवर १५ किलो वजन घेऊन हातात बंदूक घेऊन आणि डोळ्यात तेल घालून भारतीय सीमांच आपल्या तिरंग्याच रक्षण करत असतो. तेव्हा त्याची थोडी का होईना जाणीव आपण भारतीय म्हणून बाळगूया. तिकडे अमर झालेल्या आणि देशाच रक्षण करणाऱ्या सर्व सैनिकांना माझा कडक सॅल्युट आणि नतमस्तक.

Content Credit – Vinit Vartak

Link – https://www.facebook.com/vinit.vartak.7/posts/10155881244524794

comment 2 Comments

Vadval Samaj History

सोमवंशी क्षत्रिय वर्गाला पंच-कळशी आणि चौ-कळशी अशी नावे पडलेली आहेत. ज्यास आता पाच कळशी आणि चार कळशी असे म्हटले जाते. या समाजाचे अरविंद कोल्हे सांगतात की, ही नावे लग्नातील एका विधीवरून पडलेली आहेत. वराची वरात ही सिंहासनावरून काढली जाते. सिंहासनाच्या चार कोपऱ्यांत आणि एक मध्यभागी कलश मांडले जातात त्यांना पंच-कळशी म्हणात. जे चार कलश मांडतात त्यांना चौ-कळशी संबोधतात.

आज हा समाज पालघर जिल्ह्यातील मूळ रहिवासी म्हणून ओळखला जातो. डहाणू, वसई तालुक्यात हा समाज प्रामुख्याने आढळतो. १०० टक्के साक्षर असलेल्या समाजाची लोकसंख्या साधारणत: ५० ते ५५ हजार इतकी आहे. येथे वास्तव्यास आल्यानंतर या समाजाने नांगर हातात घेतला म्हणजेच लोकांनी शेती हा व्यवसाय मोठय़ा प्रमाणात स्वीकारला.

पुढे त्यांचा मूळ व्यवसाय शेती-बागायती झाला. अनेक शतके शेतीवाडीत काम केल्यामुळे यांना वाडीवाला समाज म्हणून ओळखले जाऊ लागले. पुढे अपभ्रंश होऊन वाडवळ असे नाव या समाजाला मिळाले आणि ते प्रचलितही झाले.

मुख्यत्वे भाताची शेती केली जात होती. आजही काही प्रमाणात भाताचे पीक काढले जाते. पूर्वी ऊसाचे उत्पन्नदेखील घेतले जात होते. ब्रिटिशांच्या काळात सुपारी आणि विडय़ाच्या पानांच्या लागवडीचे प्रमाण वाढले. या भागातील पानाला भरपूर ठिकाणाहून मागणी होती. रेल्वेने देशात, पाकिस्तान या पानांची निर्यात केली जात होती. पानाची लागवड करणाऱ्यांना पानवेली वाडवळ असेदेखील म्हणत असे. तसेच केळी उत्पन्नही मोठय़ा प्रमाणात घेतले जात होते आणि आजही काही प्रमाणात घेतले जात आहे. राजेळी, वेलची, बसराई, तांबडी इत्यादी प्रकारच्या केळींचे उत्पन्न घेतले जात होते. हंगामी पालेभाज्या, फळभाज्या पिकवत असत. नारळ, सुपारी, चिकू, फणस, आंबे, काजू, चिंच, पेरू, पपनिस इत्यादी फळांच्या बागा बनवून उत्पन्न काढले जात होते. आज फळांच्या बागा हा जोडधंदा म्हणून राहिलेला आहे. तसेच मोगरा, गुलाब इत्यादी फुलांची लागवड केली जात होती. उन्हाळ्यात कडधान्य-डाळींचे उत्पन्न घेतले जात होते.

या समाजाला अनेक नावांनी ओळखले जाते, पण अनेकदा आडनावे हीदेखील समाजाची ओळख बनतात. पाटील, राऊत, चौधरी, वर्तक, चुरी, सावे, चोरघे, म्हात्रे, मंत्री, कुडू, घरत, कवळी इत्यादी सोमवंशी क्षत्रिय समाजातील काही प्रमुख आडनावे आहेत. या समाजाने आपली घरे वाडीत बांधली होती. एकाच घरातील १०-१२ घरांच्या समुच्चयाला वाडी असे संबोधतात. पूर्वी घरे बांधताना कारवीचे कूडांचाही वापर केला जाई. कौले, मातीच्या वीटा, मातीचा लेप लावून बांधत होते. ओटी, ओसरी, दोन खोल्या, माळा, स्वयंपाकघर, समोर अंगण आणि मागे परस नाहणी घर अशी एकंदरीत घराची रचना केली जात असे. ओटीला ओटला असे बोलीभाषेत म्हणतात. त्यावर लाकडी झोपाळा लावलेला असे. आज स्लॅबचे बंगले बांधलेले असले तरी त्यांच्या आधुनिक ओटय़ावर आजही झोपाळा दिसतो. पूर्वीचा ओटा साधारण ५ फूट लांब आणि ५ फूट रुंद असे. ओसरीवर बसण्यासाठी लाकडी किंवा मातीला भिंतीला बाक बनवलेला असे. ज्यावर साधारण आठ लोक बसतील एवढा मोठा असे. तसेच सुंभाने विणलेली खाट ही असे. घरात उखळ, मुसळ, दगडी पाटा-वरवंटा, लाकडी पेटी, फडताळे, मातीची मुजी किंवा पराडा, कळंगा (भात साठवण्यासाठी वापरत होते) इत्यादी वस्तू असत.

शेती हा व्यवसाय स्वीकारल्यामुळे, त्याला साजेसा पोषाख परिधान करू लागले. जाडे धोतर, सदरा, पांढरी उंच टोपी. तर काही विशेष प्रसंगी पागोटे आणि उपरण कधी पगडीदेखील परिधान करीत असत. महिला विशेष प्रसंगी नऊवारी साडी आणि खणाची चोळी परिधान करत असे. सोमवंशी क्षत्रिय समाज संघटनेचे माजी अध्यक्ष आणि समाजाचे प्रमुख नेते असलेले विलास चोरघे सांगतात की, विधवेला पांढरे कपडे घालण्याची सक्ती या समाजात कधीच नव्हती. त्या विविध रंगी कपडे घालण्याची मुभा होती.

हा समाज उत्तरोत्तर बदलत गेला. बदल स्वीकारत गेला. हा समाज एकमेकांना साथ देत पुढे गेला.

Credits –
https://www.loksatta.com/thane-news/vadval-community-in-vasai-1621538/