नंदादेवी एक साहसी अनुभव……… हर्षाली वर्तक
(भाग – दुसरा)
————————————————————————————-रात्री 10:30 नंतर फायनली मी मूनस्यरी ला पोहचली, याचे समाधान वाटले प्रचंड झोपे मुळे आता ‘डोळ्यांच्या पापण्या जड झाल्या होत्या, दोन दिवस झोप नीट मिळलीच नव्हाती,माझ्या साठी बुक केलेल्या रूम मध्ये गेली, नीट हॉटेल चे नाव सुध्दा पाहिले नाही, बाकी सगळे मेंबर झोपले आहेत समजले सकाळी भेटू असं विचार करून सरळ रूम वर गेले सगळे करून झोपताना 11:45 झाले …..
15 मे,
रूमचे दार कोणी तरी वाजवले त्या आवाजानी जाग आली
” मॅडम जी चाय” हा….नही अभी नही बाद मे आती हू….मी दार न उघडताच उत्तर दिलं. .7 वाजले होते..5/10 मी. नी दरवाजा उघडून बाहेर आली, मस्त बर्फाच्छादित डोंगर, त्यावर ढग उतरून आले होते, ते पाहून मन प्रसन्न झाले, दोन दिवस केलेला प्रवासाचा क्षिण निघून गेला खूप उत्साही वाटू लागले ….फ्रेश होऊन मी 8:30ला नाश्ता साठी गेली…बाकी टीम ची ऐक ऐक करून ओळखी झाल्या, काही जणाना खूप आश्रय वाटले ,की मी इतकं सगळे करत मूनस्यरी ला पोहचली याचे, गप्पा मध्ये परोठा आणि चहा झाला, लोकल गाईड आणि बाकी मेंबर्स ची ओळख झाली, कोणी या आधी काय आणि कोणते ट्रेक केले आहेत, लोकल गाईड लक्ष्मण आणि कुक पुष्कर नेगी याची सुध्दा ओळख झाली…10वाजुन30मी. नी हॉटेल “ब्रम्हकमल”मधून निघायचे ठरले…सगळे आपापल्या रूम मध्ये जाऊन आवरा आवरी करू लागले…
आज पासून ट्रेक सुरू होणार पाहून सगळे जय्यत तयारीला लागले…. सगळे वेळेत आले पण आमचे नंदादेवी ची परमिशन (परमिट)आले नव्हते. त्या मुळे थोडे थांबावं लागले ,त्यात लोकल पेपर चा वार्ताहार आला (दैनिक जागरण)आणि त्या ठिकाणी जाणारी या वर्षी ची आमची पाहिली टीम म्हूणन आमच्याशी बोलण करून पेपर मध्ये दिलं(परत आल्यावर पेपर मिळाला पण त्यात नावाची पुरेपूर वाट लावली होती असोत,पण पेपर मध्ये नाव होते)
साधारण 11वाजुन30 मी. च्या सुमारास आम्ही दोन सुमो करून तिथून निघालो….12 च्या सुमारास आम्ही चिलम धार या ठिकाणी पोहचलो..इथून आमचा ट्रेक सुरू होणार होता…12वाजुन15 मी, नी सगळ्यानी एकमेकांना शुभेच्छा देत ट्रेक सुरू केला आज जास्त लांब जायचे नसल्याने सगळे सावकाश मस्त गप्पा आणि फोटो काढत निघाले ,3वाजुन30 मी नी सगळे जण लीलाम (6070ft)ला पोहचेले आज आम्ही इथेच थांबणार होते.कॅम्प साईट छान होती समोर डोंगरात बुई आणि पासो गाव लांबवर दिसत होतं….20/25 घर मोजून असतील इतकाच गाव होत, आमच्या कॅम्प साईट जवळ एक घर होते त्यांच्या गाई होत्या… त्या मुळे आम्हला तिथे ताक मिळाले. खर तर माझ्या साठी माझा लोकल गाईड लक्ष्मण घेऊन आला. ..त्यात ते फुकट ,त्याच्या साठी गाय म्हणजे गो माता म्हूणुन मला हे फुकट मिळाले…चंद्र तारे, समोर च्या डोंगरात दिसणारे गाव, ते लुकुलकणारे दिवे…मुंबईत धावपळीच्या जगात हे पाहायलाच मिळतं नाही..रात्री चे जेवण झाल्यावर मी बराच वेळ हे पाहत बसली होती….थोडा वेळ किचन तंबू मध्ये सुध्दा जाऊन त्यांच्या शी गप्पा मारल्या…आणि माझ्या आवडत्या स्लीपिंग बॅग मध्ये शिरली ,उदय चा पल्ला थोडं मोठा आहे त्या मुळे लवकर उठावे लागेल हे आमच्या गाईड नीरज नि आधीच संगीतले… टेंट आणि स्लीपिंग बॅग माझे आवडते कॉम्बिनेशन.. मी खुश… 🙂
16 मे..
सकाळचे 5 वाजले असतील..पुन्हा तेच शब्द ” मॅडम जी चाय” माझं तेच उत्तर अभी नही आती हू बाद मे..7 वाजता निघायचे होते त्यात सगळे आवरून…स्लीपिंग बॅग पहिली भरली आणि बॅग रेडी केली मग ब्रश आणि ब्रेकफास्ट मॅगी सोबत चहा घेतला…आज पॅक लंच होते कारण जवळ जवळ 12km चे अंतर होते. ( गाईड कडून मिळालेल्या माहिती नुसार) पसायदान आणि शिव र्गजना करून 7वाजुन10 मी. नी आम्ही लिलांम चा निरोप घेतला…..पुगदेव हे ठिकाण साधारण 1 मीटर वर लागले, त्या नंतर 400 मीटर वर खलकोट, ते मेन सिंग टॉप हा टप्पा मला वाटत कोणीच विसरणार नाही…साधरण 3 तास सतत चढत होतो सूर्य डोकयवर आला होता 3 तास चालून (न थांबता) 3km फक्त झाले होते…तिथे असलेल्या माहिती फलका नुसार… इथे 10-12 मीनीटा मध्ये 1km (मुबंईत)होतो ,आणि इथे 1 तास 1km काही गणित समजत नव्हाते…डोकं बाजूला ठेऊन पायची गती वाढवली… निमुळता होत जाणार रास्ता आणि दुसऱ्या बाजूला दरी, असा रस्ता होता कोणी कोणाला ओव्हर टेक करू शकणार नाही. त्यामुळे प्रतेक जण आपापल्या हिशोबाने चालत होते….या पुढे (z )सारखा एक टप्पा होता. आज चढण काही संपत नव्हाती….पुढे बुरांसची (rhododendron) झाडं दोन्ही बाजूंनी आणि गर्द झाडी असलेला 1 km चा परिसर आला खूप मस्त सिनेमात असतो तसा….2km झाल्यावर बबलधार या ठिकाणी पोहचलो…इथेच जेवण घायचे ठरवले,जेवण होते न होते तोच पावसाचे आगमन झाले थोडा वेळ थांबून पाहिले ,पण पोंन्चो बाहेर काढावे लागले, बॅगा ना कव्हर आले आणि पुढची वाट सुरू झाली पटकन थंडावा जाणवू लागला.. बबलधार वरून 1km अंतरावर रडगाडी पूल होता…खरोखरच पूल होता…मस्त एक नदी त्या खालून वाहत होती प्रसन्न वाटत होते डोगर दरी आणि नदी चा आवाज…या नंतर चा प्रवास थोडा चढ उतार असा होता..रडगाडी पासून सुनी 2km होते …बाजूला नदी वाहत होती( गोरीगंगा-नावा प्रमाणे खरच पांढऱ्या रंगाची गंगा ) ,3km आणखी प्रवास करत आम्ही आजच्या मुकमच्या ठिकाणी पोहचलो… बुगदियार(8560ft),आमच्या कडे असलेल्या ऍडव्हान्स टेक्नोलॉजी नुसार आम्ही आज 14km ची पायपीट केली होती साधरण सगळे येई परेत 5:30 झाले होते…
बुगदियार ला पोहचलो तर तिथे ITBP ( indo-tibetan border police) च्या छावण्या होत्या ,तिथे प्रतेकाचे परमिट तपासले गेले, मिलांम आणि नंदादेवी चा बराच रस्ता सेम आहे,(दोन्ही साठी इथून जावे लागते) लिलम गावातून येणाऱ्या कडे सुध्दा त्यांची ओळख प्रत पाहून मग त्याना पुढे जायला मिळत होते,थोडा वेळ त्या पोलीसाशी बोलण मी पसंत केले, त्यात किती तरी जण 6 महिने 1 वर्ष घरी गेले नव्हते,थोडे वाईट वाटले पण अभिमान ही वाटला, ऐक मस्त सॅल्यूट करून मी पुढे गेली. इथे छोटी लोकवस्ती होती ,धाबे आणि राहायला खोल्या होत्या, थंडी असल्याने बाकी टीम ने खोली घेऊन राहणं पसंत केले ,पण मी मात्र टेंन्ट मध्ये राहणं पसंत केले, इथे ऐका कुत्रा सोबत मस्त दोस्ती झाली जणू काही हा माझा आहे तसा तो येऊन माझ्या मांडीत बसत होता…मी त्याला काही खायला न देता त्याचे माझ्या वरचे प्रेम पाहून सगळे आचार्य व्यक्य करत होते, बाजूला मस्त नदी आणि डोगर रांगा ….
अशी सुंदर बुगदीयार ची कॅम्प साईट होती.
–
17 मे,
बुगदीयार (8560ft).. आज आम्ही बुगदीयार वरून निघून
मार्तली(mortoli) ला जाणार होतो (18 km )
सकाळी सगळे ठरल्या प्रमाणे निघाले ,काही ना समान मुळे चालणे कठीण झाल्या मुळे त्यानी आपले समान किचन आणि टेंन्ट च्या सोबत दिले, मला मात्र ते जमत नाही शेवट परेत आपले सगळे समान आपल्या सोबत राहिले पाहिजे ही (Nim-नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ मोउंटनरीग) ची शिकवण…मी आज परेत कधीच माझे समान कोणाला दिले नाही ,15kg ची आता मला सवय झाली आहे…सकाळी 7वाजुन5 मी. नी बुगदीयार सोडले …रस्त्यात पोर्टिंग ग्लेशियर(हिमनदी)चे पाणी वाहत असलेल्या ब्रीज वरून सुरवात झाली. ऐका मंदिरा जवळ पोहचलो, आमच्या गाईड ने तिथे अगरबत्ती लावून पूजा केली आणि पुढचा प्रवास सुखाचा व्हावा या साठी प्रार्थना केली. इथून पुढे नहरदेवी ला पोहचलो ,3km असेल साधरण..आज पूर्ण रस्ता नदी सोबत होता थोडे चढ उतार करत आम्ही मकवाना ला पोहचलो ,आणि जेवण घेतलं, पुढे लाप्स लागले थोड्या पुढे एक अर्ध्या किलो मीटर अंतर पार केले असेल सुंदर असं एक ग्लेशियर(हिमनदी) आले आम्हला त्या वरून जायचे होते. बर्फाच्या हिमनदी वरून जाताना बरेच जण घाबरून गेले गाईड नि याची ओळख बनकटीया ग्लेशियर अशी करून दिली, आम्हला रस्त्या मध्ये दोन दिवस खूप गावकरी दिसत होते ,न राहून त्यांच्या शी मी बोलण सुरू केलं ,थोडे गढवाली येत तस मला, 3 वर्षांत शिकली इथे येऊन,सगळी गावातली लोक इथे का जात आहेत हे विचारले फारसं काही मन मानेल असे उत्तर आले नाही. मग लक्ष्मण ला विचारले, तेव्हा तेथे ही लोक किडा जडी शोधण्यासाठी जातात हे समजले….हे नक्की काय असते याची उत्सुकता लागली, एका ठिकाणी गावातील दोन बायका थांबल्या होत्या, त्यांना विचारू असे मी ठरवले, मी त्यांना एक गढवाली गाणं बोलून दाखवले “गुगुती गुरांना लागी….” त्याना खूप आनंद झाला, मग मन मोकळ्या गप्पा झाल्या मग समजले किडा झाड/ किडा जडी/ यारसा गोम्भू अशी नाव असलेले हे किडे शोधण्यासाठी ही लोक जात आहेत साधरण मे ते जून मध्ये हे 4500mt ते 5500 mt मध्ये मिळतात ,हे अँटीऐजिंग आणि शक्ती वर्धक म्हणून याची खूप मागणी आहे ,100gm साठी 15000 rs मिळतात. या साठी सगळे गाव वरती जाऊन मुकाम करून एक महिना राहून जे मिळते ते घेऊन खाली येतात… हे माझ्या साठी तरी नवीन होते पाहण्याची इच्छा झाली परंतु हे गावकरी आता शोधण्यासाठी जात होते एक महिन्यानि परत येणार कसे कळणार हे कसे असते(माझी ही इच्छा पण पूर्ण झाली गाईड लक्ष्मण मुळे)
आम्ही अजून 4वाजुन40मी. झाले तरी रीलकोट परेतच पोहचले होते…अजून काही जण येणे बाकी होते…अजून 6km वर मारतोली आहे ,सगळे जण पोहचले नव्हते आणि अजून 6km बाकी होते, पुढे जाणे शक्य नव्हते कारण टीम सगळी पोहचू शकणार नव्हती. त्यात तो रॉकफॉल चा परिसर सगळयांनी सह मतांनी 5:30 ला इथे राहायचे ठरवले परंतु बाकी 12 मेंबर चे समान पुढे गेले होते माझे सगळे समान माझ्या सोबत होते(मला मिळालेल्या प्रशीषणाचा मला झलेला फायदा) आता पुढे काय ….
इथे एक छोटे हॉटेल(धाबा – ह्यातसिग रिलकोटीया) होता, पण त्याच्या कडे सुध्दा 6-7 लोकांची सोय होऊ शकत होती , जे दमले आहेत त्यानी इथे थांबावे आणि मी व बाकी काही जण पुढे जायचे असे प्रथम दर्शनी ठरले परंतु नीरज आणि लक्ष्मण नि थोडी सोय केली, आणि रात्र इथे काढायची ठरले, परंतु झोपण्या साठी पुरेसे समान नव्हते 3-4 ब्लॅंकेट आणि समान यात बाकी टीम ला ऍडजेस्ट करावे लागले,माझी स्लीपिंग बॅग माझ्या बॅगेत होती त्या मुळे माझी सोय झाली, हॉटेल वाल्याची मुलगी भावना हिच्या सोबत मला तिची खोली मिळाली ,पण ब्लॅंनकेट वगरे काही नव्हते माझ्या स्लीपिंग बॅग मुळे मला कसली गरज लागली नाही…माझ्या चांगल्या सवाई मुळे पुन्हा मी वाचली होती…