comment Add Comment

पाऊस

कडक उन्हाचे दिवस सरले
पावसाने येण्याची चाहूल दिली
पावसाच्या चाहुलीने कोकीळ गायला लागली
कोकीळच्या आवाजात मन रमले
बघताच पावसाची पहिली सर आली
सरीने अंगण भिजले
मातीचा गंध दरवळला
झाडेही जणू नाचू लागली
पावसाकडे बघता बघता दिवस मावळला
चोहीकडे जणू आनंद पसरला

रचना : कु. राजस्वी विजय राऊत.

comment Add Comment

बहिण माझा आधारस्तंभ

तुझं माझं नात खास आहे
कारण तुझं माझ्या जीवनात एक वेगळं स्थान आहे
लहानपणीच्या भातुकलीपासून ते आत्ताच्या shopping पर्यंतचा प्रवास
लहाणपणीच्या मस्तीपासून ते आत्ताच्या secrets पर्यंतचा प्रवास
साऱ्यातच खूप काही आठवणी दडलेल्या आहेत
तुझ्या माझ्या मधील bond ला अजूनच घट्ट बनवत आहेत.
प्रत्येक क्षणाला प्रत्येक वेळेला मला तू साथ देते
सगळ्यांनी जरी नाकारले मला
तरि तू तुझा हात माझ्या हाती देते
थोडीशी passesive आहे तू
वाट चुकतात समजावून सांगणारी तू
प्रेम खूप करते माझ्यावर
पण कधी दाखवत नाही
माझी काळजी नेहमी करते
पण कधी जाणवून देत नाही
आई सारखी घर सांभाळते
बाबांसारखी घराचा आधारस्तंभ बनली आहे तू
माझी सर्व स्वप्न माझ्या सर्व इच्छा सर्व समजून नेहमी मला मोठं करणारी तू
तुझ्यावर रागावते मी पण तू नेहमीच कशी ग समजून घेते ?
तुझ्यावर खूप प्रेम करते मी त्यामुळेच माझी कविता प्रेमाने भरते आहे मी
कधी कधी काही समजत नाही त्या वेळेला माझी ताकद आहे तू
मी खूप भाग्यवान आहे कारण माझी मोठी बहीण आहे तू
कारण माझी मोठी बहीण आहे तू….

कु. राजस्वी विजय राऊत.

comment 2 Comments

आयुष्य

आयुष्यात मज भेटली असंख्य नाती
गोड, आंबट, तिखट, तुरट भासणाऱ्या चवीसारखी
काहींनी साथ दिली आयुष्याभरसाठी तर,
काहींनी साथ सोडली अर्ध्यावाटेवरती
प्रत्येक नात्याने एक वेगळा अनुभव दिला
आयुष्याची रीत अशीच आहे
कधी प्रेमाने तर कधी दुःखाने जीवन जगणे हेच खरे आहे…..
कु.राजस्वी विजय राऊत

comment Add Comment

प्रेम

कस सांगु तुला माझ्यासाठी कोण आहेस तु
स्वप्नापरी सुंदर सत्य तु
सत्यातील विश्वास आहेस तु

माझ्या प्रत्येक विचारात येणारा पहिला विचार तु
माला जाणवणारा भास तु
नकळत गालावर येणाऱ्या हास्यात आहेस तु

पावसातील पहिली सर तु
हिरव्यागार गवतावरील दवबिंदु तु
माझ्या हॄदयाचा ठोका आहेस तु

माझ्या कवितेतला शब्द तु
माझ्या जीवनातला अर्थ तु
माझा श्वास आहेस तु

कोणीही प्रेमात पडेल असा तु
गोड़ आशा हास्यातील गोडवा तु
कस सांगु तुला माझ्यासाठी कोण आहेस तु

थोडक्यात माझी
प्रेम आहेस तु

कु.राजस्वी विजय राऊत.

comment Add Comment

वाडवळी भाषेचे अंतरंग

आपली भाषा टिकावी असे अनेकांना वाटते. वाडवळ समाजही याला अपवाद नाही. मात्र अनेकदा भाषा टिकावी यासाठी जे शास्त्रीय प्रयत्न करावे लागतात ते तसे होताना दिसत नाहीत. बहुतेक वेळा आपली भाषा टिकवण्याची कल्पना म्हणजे भाषेतील शब्दांचा संग्रह काढणे किंवा जास्तीत जास्त भाषेचा शब्दकोश तयार करणे यापलिकडे जाताना दिसत नाही. यासाठी कुणालाही दोष देता येणार नाही. कारण आपल्या भारतात अत्यंत प्राचीन काळी जे भाषाविज्ञान अभ्यासले आत होते, ज्या योगे पाणिनी आणि भर्तृहरी यांनी अनेक सिद्धान्त मांडले ते भाषाविज्ञान अलिकडे समाजात फारसे लोकप्रिय दिसत नाही. अनेक शिकल्या सवरलेल्यांनाही लिंग्विस्टीक्स म्हणजे काय हे माहित नसते. तेव्हा इतरांची काय कथा? त्यामुळे भाषा टिकावी असे वाटत असल्यास त्या भाषेचे स्वर, व्यंजन, त्या भाषेतील शब्दांची बांधणी, त्यामध्ये दिसणारे आकृतीबंध, त्या भाषेचे व्याकरण, त्या भाषेतील नाम, सर्वनाम, विशेषणे, क्रियापदे, क्रियाविशेषणे इत्यादींची वैशिष्ट्ये, त्या भाषेत कालानूरुप घडत गेलेले बदल आणि तदानुषंगिक अनेक गोष्टींचा अभ्यास करणे गरजेचे असते.

या दिशेने म्हणजेच लिंग्विस्टीक्सच्या मार्गाने वाडवळीचा अभ्यास करावा असा एक विचार माझ्या मनात आहे. हे काम फार मोठे आणि वेळ घेणारे आहे. त्यात अनेकांचे सहकार्य आवश्यक आहे. वाडवळीचे काम हे मोठे आहे म्हणण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे ही भाषा सर्व वाडवळ समाज बोलत असला तरी गावागणिक या भाषेत फरक पडताना आढळतो. वसईच्या वाडवळीत पोर्तुगीज शब्द जास्त आढळतात तर आमच्या तारापूर चिंचणीच्या वाडवळीवर गुजरातीचा प्रभाव जाणवतो. स्थूल मानाने विरार वसई, माकुणसार दातिवरे, केळवे माहीम, तारापूर चिंचणी आणि बोर्डी असे विभाग केले तर या भागांमध्ये बोलल्या जाणाच्या वाडवळीत काहीएक फरक निश्चितपणे जाणवतो. वाडवळीचा भाषाविज्ञानाच्या अंगाने अभ्यास करायचा झाल्यास हे बदल लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. अशा अनेक गोष्टींचा या अभ्यासात विचार करावा लागेल.

डॉ. अतुल ठाकुर

comment 2 Comments

भावना आईबाबांच्या मनातल्या….. माझ्या घरी आली एक गोड परी तू

पाहिली मी वाट तुझी 9 महीने 9 दिवसाची ग
भराया मायेची ओंजल आलीस तूही एवाढ्या दुरून ग
घेता तुज माझ्या हाती फुटला मज ममतेचा सागर
धन्य झाले जीवन लाभले आई होण्याचे भाग्य
चंद्रालाही लाजवेल असे गोड रूप तुझे
घेतले मी सामावून तुझ्यात विश्व हे सारे माझे
बोबल्या बोलांनी तुझ्या घर बहरले
नाजुक तुझ्या पावलांनी सारे काही सुखावले
घोड़ा करुन बाबांचा तुझी स्वारी पाठीवर
तुझ्या त्या आनंदाला कसलाही थारा नाही
शाळेतला पहिला दिवस तुझा, हुरहूर माझ्या मनाला
करताना टाटा मज डोळे तुझे पाणावाले
जाऊ नकोस आई तू मज सोडून
ओठानी तुझ्या हे स्वर उच्चारले
बाबा तुम्ही कुठे आहेत? विचारी तू फोनवर
तुझा काळजीरूपी आवाज ऐकून बाबाही करी पळापळ
आईपेक्षा बाबावर करी तू लळा
बाबांचा तू लाडोबा जीवाचा तू त्याच्या ठोका
हळूहळू झालीस तू मोठी, झाले तुझे लग्नाचे वय
आले स्थळ तुला कोणा नातेवाईकाकडून
मुलगी म्हणजे दुसर्याच्या घराला आपलस करणारी
कधीतरी करावीच लागणार होती तिच्यावीना जगण्याची सवय
सुखाने होऊदेत तिचा लग्न प्रवास साताजन्मांसाठी
राहशील परी बनून माझ्या ह्या हॄदयाची
येईल आठवन जेव्हा तुझी येशील ना भेटाया मज वेळ काढूनी
राज्य असेल कायम तुझे तुझ्या ह्या आईबाबावर
गेली आहे जरी तू सासरी राहिल नेहमी आमच्या सोबती तू
माझ्या घरी आली एक गोड परी तू
माझ्या घरी आली एक गोड परी तू

कुमारी-राजस्वी विजय राऊत.

comment 1 Comment

बाबा तुमची खुप आठवण येते….

😞बाबा तुमची खुप आठवण येते😞
रात्र लोटली दिवस उजाडला सर्व काही नेहमीप्रमाणे आनंदी होत. सकाळची दुपार झाली आणि मग ती काळी संध्याकाळ आली आणि बाबा तुम्हाला कायमच आमच्यापासुन लांब घेऊन गेली…..हे जेव्हा समजले तेव्हा काय करावे काही सूचलेच नाही फक्त एवढेच समजत होते बाबा तुम्ही उठून म्हणावे अग वेडे थट्टा केली पण बाबा तुम्ही उठालेच नाही……तुमच्या आधाराचा हात आम्हा पिलांच्या डोक्यावरुन कायमच काढून टाकलात. ज्या वयात काही कळत नव्हते त्या वयात तुम्ही सोडून गेलात. तुम्ही मोठी आव्हाने पेलायला शिकवले आहे पण, बाबा ती आव्हाने पेलण्याएवढे मोठे आम्ही नक्कीच नव्हते सांगा ना बाबा तुम्हाला अस आम्हाला अर्ध्यावरती सोडून जाण पटल का?
बाबा जगतोय हो आम्ही तुमच्याशिवाय पण तुम्ही असताना सर्व खुप वेगळ होत आणि आता सर्व खुप वेगळ आहे…हे खर आहे ना बाबा जो आवडतो सर्वाना तोच आवडतो देवाला म्हणुन देवाने नेल ना आमच्यापासुन लांब तुम्हाला मग बाबा आम्ही चांगले वागु की वाईट तुम्हीच सांगा ना?
तुम्ही बोलायचे मी गेल्यावर लोकांची खुप गर्दी जमेल ही गर्दी दाखवून देण्यासाठी गेलात का हो बाबा?
आता ह्या social media च्या काळात सर्व मित्र त्यांच्या फॅमिली सोबत फ़ोटो काढून टाकत असतात आता तुम्हीच नाही आहेत तर बाबा तुमच्यासोबत आम्ही फोटो कसे काढू? फोटोमध्येच तुम्ही कायमचे जाऊंन बसलात. बाबा फोटोमधुन तुम्ही बघत असाल आम्हाला असा भाबडा समज आहे. तुमची आठवण आली नाही अस कधीच झाल नाही, आठवण्यासाठी विसराव लागत मात्र ते कधीच आल नाही. अजूनही तुम्ही गेले आहात आमच्यातून हे मानायला आम्ही तयार नाहीत. शेवटी एवढंच सांगेल बाबा आम्ही सर्वजन तुम्हाला खुप मिस करतोय आणि आम्हाला हे पण माहिती आहे तुम्ही आम्हाला खुप मिस करत असाल…..Love you so much baba
कु.राजस्वी विजय राऊत.

comment Add Comment

तू नदी आहेस

तू नदी आहेस..
तू वाहत राहा,तू विस्तृत हो…
एकाजागी थांबून,पाण्याचं डबकं मात्र होऊ नकोस !

करशील पाषाणावरही मात तू
शोधशील नवी, स्वप्नांची वाट तू
तूच घडवशील नवी पिढी
कुशीत नांदतील तुझ्या सवंगडी !

झरा-धबधबा नाव घेत
तू वाहत आहेस जोमाने
शीतल, कोमल, तरल ,निर्झर…
सारेच शब्द, तुझ्यापुढे फिके !

जाता तू , डोंगराच्या पायथ्याशी..
वाट पाहते , तुझीच सावली
विचारतेस तू , थांबलेल्या प्रवाहाला..
का बरं तू , त्या समुद्राला घाबरलीस ?

तू नदी आहेस…
तू वाहत राहा,तू विस्तृत हो…
कोणा ऐऱ्या-गैऱ्याचे, भय मात्र बाळगू नकोस !

असेल तो, अथांग-विस्तिर्ण सागर
पण त्याला सुध्दा,वाहत्या नदीचाच लोभ !
म्हणून तर जलाची करुन आग
बरसतो तो पुन्हा,पाऊस होऊन !

– पर्णिका राऊत , चिंचणी

what will say -rajaswi
comment Add Comment

लोक काय म्हणातील…..

लोक काय म्हणतील…..

लहानपणापासून खुप काही गोष्टी कारायच्या होत्या, आनंद घ्यायचा होता त्या गोष्टीचा,पण
लोक काय म्हणतील……
वाटत असत सकाळी खुप अरामात उठाव,अरामात अवराव,पण
लोक काय म्हणतील……
वाटत असत सकाळी उठाल्यावर मोठ्याने गाणी ऐकावी, धींगाना घालावा,पण
लोक काय म्हणतील……
वाटत असत रस्त्याने चालताना कोणी भेटले,तर थोड़ थांबवे न बोलावे,पण
लोक काय म्हणतील……
वाटत असत एखाद काम पूर्ण झाल तर, आनंदाने ओरडाव सेलेब्रेट कराव,पण
लोक काय म्हणतील……
वाटत असत मित्रमैत्रीणीं सोबत वेळ घालवावा, मोठ्यमोठ्याने हसाव,मज्जामस्ति करावी,पण
लोक काय म्हणतील……
वाटत असत कधीकधी थोड़ नटाव,थोड़ नीट राहाव,पण
लोक काय म्हणतील……
वाटत असत तिहि नाती जपावी, जी नाती रक्ताची नाहीत, मनाने जोडलेली आहेत,पण
लोक काय म्हणतील……
वाटत असत बसमध्ये बिंधास्त होऊन चढ़ावे,मध्येच कधी तरी बेल मारावी,पण
लोक काय म्हणतील……
वाटत असत आपल्याला हव तस जगाव,हव तेव्हा हव ते कराव,जीवनातल्या प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घेत आयुष्य जगावे,पण
लोक काय म्हणतील……
अहो पण हे लोक आहेत तरी कोण??
आणि हे लोक कधी थांबतिल का बोलायचे??
शेवटी काय तर हे आयुष्य लोक काय म्हणतील ह्याच विचार करण्यात घालवायचे…….??

– कु. राजस्वी विजय राऊत.

comment Add Comment

आज अचानक

आज अचानक काय झाले
कोणास ठाऊक
पण जुने सारे काही स्पष्ट आठवले
ओठांवर थोड़े हसू आले आणि
डोळ्यांनी म्हात्र अश्रू वाहिले……
आज अचानक काय झाले
तुझ्या प्रेमात पुन्हा पडावे आणि
तुला पाहतांना मी मालाच विसरावेसे वाटले…….
आज अचानक काय झाले
मोह झाला ह्या वेड्या मना तुझ्यात गुंतण्याचा, त्या जुन्या आठवणींमध्ये रमण्याचा, तुझ्यातल्या माला पाहण्याचा…..
आज अचानक काय झाले
का असे वाटले गेलेली वेळ पुन्हा यावी आणि तुझ्यामाझ्यातल्या नात्याला नवीन दिशा मिळावी……
आज अचानक काय झाले
तुला भेटण्यासाठी मन आतुर झाले
डोळे त्या वाटेकडे एकटक बघत राहिले……
आज अचानक काय झाले
जुने सारे विसरून तू माला माफ करावे
बघता बघता आशेचे दिवे उजळावे…..
आज अचानक काय झाले
का हे सारे काही मनातले बाहेर आले?
का ह्या आठवणी जाग्या झाल्या?
ह्या उत्तरासाठी मन झुरत गेले…..
आज अचानक काय झाले
सारे काही माहिती असून पण का ह्या वेड्या विचाराने मनाला व्याकुळ केले…..
आज अचानक काय झाले
मनाने तू येण्याची आशा सोडली
देहाने जगणे सोडले
आज अचानक काय झाले
आज अचानक काय झाले…???

कुमारी: राजस्वी विजय राऊत.

comment 4 Comments

ताई

ताई

ममतेची माऊली आईची सावली
नेहमी हसणारी हसवणारी आहेस ग तू ताई
कधी संरक्षणाची ढाल मायेची ग तुझ्या शाल
ममतेच दूसर नाव ताई खुप प्रेम करणारी जणु आई
दुःखाच्या वाटेवरिल हिम्मतीचा हात
कधी ना सूटणारा तुझाच ग ताई साथ
कधी कान धरणारी तर कधी लाडाने जवळ घेणारी
कधी रागवणारी तर कधी मस्ती करणारी
कुठल्याच नात्यात नसावी एवढी गोडी
तेवढी ह्या नात्यात आहे
म्हणून तर हे नाते साऱ्याहून बेस्ट आहे….

कु. राजस्वी विजय राऊत

comment Add Comment

बाबा

बाबा

आता कुठे जीवनाचा अर्थ कळायला लागला होता……
अजुन बरेच काही शिकायचे होते,
ऐकायचे होते, जगायचे होते तुमच्यासोबत
पण…..
पण तुम्ही गेलात….हे मानायला मन तयार होत नाही…..
तुम्ही कधी लांब जाऊ शकतच नाहीत
तुम्ही आहेत अमच्यासोबत नेहमीच.
बाबा तुम्ही कसे होतात ना,
आमच्या सोबत लहान होऊन खेळायचात, मज्जामस्ति करायचात खरच खुप आठवतात त्या आठवणी…..
तुम्ही नेहमी बोलायचे प्रत्येकाला कधी ना कधी जावेच लागते कायमचे
आयुष्य हे असेच असते ना हो बाबा
हे कळते हो ….
तरि कधी डोळे पाणावतात अन
तुम्हाला पुनः बघाण्याची आस धरतात,
तर कधी ओठ पुटपुटतात….
बाबा ह्या तुमच्या पिल्लांसाठी तरि थांबायचे ना…..

*कु.राजस्वी विजय राऊत.*