🙏🏻🙏🏻 झाडे लावा झाडे जगवा 🙏🏻🙏🏻
आज दिनांक २९.०७.२०१८ रोजी सो. क्ष. समजोन्नती संघ, शाखा दातिवरे ह्यांच्यातर्फे वृक्षारोपणचा आणि संवर्धनाचा कार्यक्रम पार पडला.
काही दिवसांपूर्वी स्थापन झालेल्या WhatsApp ग्रुप मधून चर्चेला सुरुवात झाली. झाडे लावण्यासोबतच त्यांचे संरक्षण कसे करता येईल याचं नियोजन करण्याचे ठरले. त्यानुसार झाडाच्या संरक्षणासाठी पिंजरे तयार करून झाडाचे गुरं आणि शेळ्या ह्याच्या पासून रक्षण करावयाचे ठरले. ह्या साठी लागणारे पिंजरे ग्रुप मधील सदस्यांनी थोडाफार हातभार लावून देऊ असे आश्वासन दिले, त्यानुसार श्री. हेमंत शांताराम ठाकूर ह्यांनी नियोजित पिंजरे तयार करून घेतले. चांगल्या दर्जाचे पिंजरे बनवून दिल्याबद्दल श्री. हेमंत शांताराम ठाकूर ह्यांचे मनापासून आभार.
ह्यासाठी लागणारी झाडे प्रशांत ठाकूर आणि सुशील ठाकूर ह्यांच्या पाठपुराव्याने वनविभाग सफाळे ह्यांच्यातर्फे उपलब्ध झाली त्यासाठी त्यांचे मनपूर्वक आभार.
दातिवरे गावाच्या सरपंच सौ. ज्योती तामोरे ह्यांच्या हस्ते कार्यक्रमास सुरुवात झाली. श्री. प्रशांत ज. ठाकूर ह्यांनी आपल्या छोटेखानी भाषणात वृक्षारोपणाचे महत्व सांगताना झाडांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
ह्या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य कु.गौतम य. वर्तक आणि सौ. अंकिता अमोल ठाकूर सुद्धा उपस्थित होते. हेमंत ना. ठाकूर, जगन वर्तक, सुशील ठाकूर, प्रफुल ठाकूर, प्रफुल राऊत, कुणाल ठाकूर, मोहित ठाकूर, शुभम ठाकूर, प्रणव ठाकूर, पंकज पाटिल, मयूर राऊत, अनिकेत वर्तक, भुपेश ठाकूर, प्रतिक चौधरी, प्रसाद चौधरी, सदिश ठाकूर आणि राजेश ठाकूर ई. ह्या सर्वांनी ह्या प्रसंगी मोलाचे सहकार्य केले.
🙏🏻🙏🏻 सर्वांचे मनापासून आभार.🙏🏻🙏🏻
शाखा प्रतिनिधी,
दातिवरे
दातीवरे शाखेचे पदाधिकारी व सर्व सदस्यांचे अभिनंदन ,
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडं लावण्याची खूप आवश्यकता आहे ।
खूप छान