comment Add Comment
Posted on Last updated

” तिथे रुपया वधारला “

काल प्रत्यक्ष अनुभवलं हेच ते वाक्य ” जब दस रुपये किसी गरीब को देने हो तब ज्यादा लगते है और वहा बीस रुपये वेटर को टिप में देने हो तो कम लगते है ” बरयाचदा वाचनात आल होत whatsapp,facebook,mail च्या माध्यमातून …. ( कदाचित तुमच्याही आल असेल )
काल संध्याकाळी ट्रेन मध्ये प्रवास करतांना एका स्टेशनवर एक “अंध जोडपे” चढल.सोबतीला त्याचं ८-९ वर्षाच पोर ,दोघांच्याही हातात काठी, मळके कपडे, एक कापडी पिशवी एवढाच काय तो त्यांचा ऐवज . काही वेळातच त्यांनी एक भक्तीगीत गात पैसे मागायला सुरवात केली त्या गाण्यातली आर्तता सहज कुणा निष्ठुराच्या काळजाला हात घालेल अशी होती ( खर पाहता आपण त्याला “भिक” मागणे असं म्हणतो पण पण त्या अंध व्यक्तीची दयनीय अवस्था पाहता मज तसं म्हणन्याच धाडस झाले नाही ) जो तो आपापल्यापरीने हाताला लागेल ते नाणे देत होता. मी हि ह्यास अपवाद नव्हतो. माझ्या समोरच्याचं सीटवर आसनस्थ झालेली “शुभ्र” पेहरावातली एक उच्चभ्रू गलेलठ्ठ व्यक्तीहि खिशातून नाण काढण्याचा छुपा प्रयत्न करीत होती अखेर अथक परिश्रमानंतर त्याच्या हातास एक नाण लागले पण त्याच्या दुर्दैवाने(… तस त्याच्या अविर्भावावरून दिसत होत) ते ५ रुपयाचे होते.अजून दोन -तीनदा हात खिशात हात घातल्यानंतर ह्या दानशूर कर्णाचे मतपरिवर्तन झाले बहुधा .तो पर्यंत ते अंध जोडपे काहीसं पूढे निघून गेलं होत पण ….पण आमच्या नजरा अजून ह्या गडगंज कुबेरावरच …. आणि डोक्यात अनेक विचारांचं काहूरत्यातलाच एक ” असा कितीसा फरक पडला असता ह्या सदगृहस्थाला जर का १ किंवा २ रुपयां ऐवजी ते पाचाच नाण त्यास दिल असत तरं … तिथे मग पटकन हा विचार मनास शिवून गेला …. ” जब दस रुपये किसी गरीब को देने हो तब ज्यादा लगते है… आणि मग मनातच म्हणत ट्रेनमधून उतरलो खरचं “इथे रुपया वधारला”.
-भावेश र. वर्तक. पालघर (माहीम).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *