सोबत
तुला पाहता मी हरवून गेली
माझी मी मलाच विसरून गेली….
तुझी ती चाहूल मनाला व्याकुळ करून गेली
तुझी नि माझी ती भेट मनाला आठवण देऊन गेली….
वेडावलेलं मन तुझ्याच भोवती फिरे तू असे दूर कुठे तरी जवळ भासवे….
आहेच नाते अपुले अतूट क्षणोक्षणी चालते साथ….
अशीच राहील सोबत एकमेकात एकमेकात…..
रचना:- सौ तन्वी तन्वेश म्हात्रे(T2)