🔴
पावसाळा आला की हल्ली गड किल्ल्यावर अतिउत्साही, बेजबाबदार स्वतःला ट्रेकर्स म्हणवून घेणारे निसर्गाशी आणि गडकिल्ल्यांची काही काही तमा न बाळगणारे ….., तसेच या अश्या पावसाळी भुछत्र्यांना घेऊन जाणाऱ्या बाजारु आणि गल्लेभरू आयोजक आणि संयोजक लोकांना ट्रिप अन ट्रेक यातला फरकच कळत नाही. त्यांना त्याचे काही घेणेदेणेच नसते..
पवित्र वास्तू आणि तेथील वस्तूंची तमा न बाळगणारे ,सेल्फिचे वेड, अति उत्साह, दारू-सिगारेट पिऊन धिंगाणा घालणं ,बेजबाबदारपणा, नेतृत्वाचा तसेच माहितीचा अभाव, गडावर कचरा हे तर नित्याचेच. अशा कितीतरी गोष्टी आहेत.
शिवाजी महाराजांसारखी दाढ़ी मिशी ठेवायची, रुबाब गाजवायाचा परंतू महाराजांचे विचार ना समजून घ्यायचे ना अंमलात आणायचे.
अश्या भुछत्र्यांना काही सल्ला द्यावा किंवा काही सांगायला जावे तर यांची मग्रुरी ठरलेली. ह्या लोकांना निसर्ग , इतिहास आणि ऐतिहासिक वास्तूंशी काहीही घेणेदेणे नसते…
वरील कारणांमुळे प्रामाणिक गिरिभ्रमक आणि गिर्यारोहकांना अनेक त्रासांना,समस्यांना सामोरे जावे लागते.
#गडकिल्ले हे शिवप्रेमींसाठी मंदिरे आहेत.
😊🙇🏻 – नंदन वर्तक.