Posted on Last updated
आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेला वसईकर धावपटू अमन चौधरी यांचा नुकताच गोव्यात समारंभपूर्वक सत्कार करण्यात आला आहे.
अमन चौधरी यांची क्रीडा क्षेत्रात विषेशत: आंतरराष्ट्रीय स्तरावर धावणे या प्रकारात, आपली कामगिरी उल्लेखनीयकेल्याच्या सन्मानार्थ हा विशेष मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. इथे हे उल्लेखनीय आहे की, थोर समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे, डॉ.मंदाकिनी आमटे हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून सोहळयात सहभागी झाले होते.