स्वप्नील शशिकांत चौधरी, विरार पश्चिम ह्यांस मानाचा रेड डॉट पुरस्कार २०१८ मिळाला
श्री. स्वप्नील शशिकांत चौधरी, विरार पश्चिम ह्यांस मानाचा रेड डॉट पुरस्कार २०१८ मिळाला. हा पुरस्कार त्यांस सिंगापूर येथील रेड डॉट पुरस्कार सोहळयात दि. २८/०९/२०१८ रोजी प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार म्हणजे जागतिक डीझाइन क्षेत्रातील ऑस्करच म्हणावे लागेल. भारतातील(pharmaceutical) औषधोत्पादना संबंधित मशिनरी निर्मात्यांत हा पुरस्कार मिळविणारी स्वप्नील ह्यांची मशीन संकल्पना पहिलीच आहे. स्वप्नील ह्यांनी हा पुरस्कार मिळवून त्यांची कंपनी ACG Engineering आणि भारत देशाच्या शिरपेचात मानाचा तुराच खोवला आहे. आपल्या पालघर जिल्ह्यातून हा रेड डॉट पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच आहेत.
रेड डॉट म्हणजे डिझाइन आणि व्यवसायात सर्वोत्तम आहे असे प्रॉडक्ट. हि आंतरराष्ट्रीय डिझाइन स्पर्धा “रेड डॉट डिझाइन अवॉर्ड” ह्या नावाने आेळखली जाते.
रेड डॉट डिझाइन पुरस्कार हा आंतरराष्ट्रीय उत्पादन डिझाइन आणि डिज़ाइन संकल्पना (i.e. design concept) पुरस्कार आहे; जो जर्मनीतील एसेन मधील डिझाइन झेंट्रम नॉर्डहेन वेस्टफॅलेन मार्फत दिला जातो. उत्पादन डिझाइन, डिझाइन एजन्सी आणि डिझाइन संकल्पनां ह्या पुरस्कार श्रेणीत मोडतात. ही स्पर्धाच मुळी अश्यांसाठी आहे जे त्यांच्या व्यवसायाची रचना डिझाइनद्वारे वेगळे करू इच्छितात.
भेद निवड आणि सादरीकरणाच्या तत्त्वावर आधारित ह्या स्पर्धेतून उत्पादन डिझाइन, संचार डिझाइन आणि डिझाइन संकल्पनांमध्ये सक्षम तज्ञ / जूरीद्वारे उत्कृष्ट डिझाइनची निवड केली जाते.
जागतिक डिझाईन विश्वात सर्वोच्च असा बहुमान म्हणजे Red Dot Design Award.
जसे हाॅलीऊड चित्रपट सृष्टीत आॅस्कर हा सर्वोच्च बहुमान आहे.. त्याप्रमाणेच क्रिएटीव्ह डिझाईन क्षेत्रातला आॅस्कर म्हणजेच Red Dot Design Award. जगातील सगळ्यात खडतर व कठीण डिझाईन अवॉर्ड.. ज्यासाठी जगभरातील ५५ देशातील जवळजवळ ५६४० प्रवेशिकांन मधून फक्त ५% स्पर्धक विजेते ठरतात. १९५४ मध्ये स्थापित, हा पुरस्कार जगभरातल्या वर्षातील सर्वोत्तम उत्पादनांचे मूल्यांकन करतो. या वर्षी, ५५ देशांमधून या स्पर्धेला एकूण ५,६४० नोंदी मिळाल्या आणि निर्णायक निष्कर्षापर्यंत, रेड डॉटला २६५ डिझाइन संकल्पना देण्यात आल्या.
स्वप्निल ह्यांची संकल्पना ही जगातील २६५ संकल्पनांमधील एक ऊत्कुष्ठ विजेती संकल्पना ठरली.
स्वप्नील ह्यांनी त्यांचा चौधरी परीवार, त्यांचे गाव, त्यांचा समाज, महाराष्ट्र म्हणजेच पर्यायाने हिंदुस्थानचे नाव आज जागतीक पातळींवर उंचावले आहे. त्यांच्यावर सर्वच स्तरांतुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Congratulations mama….keep it up👍proud of you
Proud of you 👍👍
Congratulations