मथाणे – उज्वल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कै सखाराम ,विष्णु व कै .विकास चौधरी स्मृती श्री गणेश सदन वास्तुचा उदघाटन सोहळा
|| श्री गणेशाय नम: ||
उज्ज्वल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे “कै. सखाराम, विष्णु व विकास चौधरी स्मृती – श्री गणेश सदन” वास्तुचा उदघाटन सोहळा मंगळवार दि. ११ सप्टें. २०१८ रोजी मथाणे(सफाळे) येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उदघाटक म्हणुन मा श्री. सुधिरजी पाटील डायरेक्टर विणा वर्ल्ड(मुंबई), प्रमुख अतिथी म्हणुन श्री दिपकजी चौधरी(जेष्ठ उद्योजक व गव्हर्नर – लायन्स क्लब ऑफ इंडिया) व श्री.अजयजी ठाकुर (अध्यक्ष – सो. क्ष. स. संघ), तसेच उज्ज्वल मंडळाचे प्रमुख सल्लागार व आधारस्तंभ मा. श्री. केसरीभाऊ पाटील व सौ. सुनीताताई पाटील(केसरी टुर्स) हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री प्रकाश वि. चौधरी यांनी भूषविले. स्वागताध्यक्ष म्हणुन श्री. अरविंद पाटील, मथाणे गावचे सरपंच श्री. महेश गो. पाटील व उज्ज्वल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. संतोष दा. पाटील, गणेशोत्सव मंडळाचे सस्थापक श्री. विजय चौधरी, श्री. हरिभाऊ पाटील व गावातील इतर मान्यवर उपस्थित होते.
या वास्तुसाठी श्री गणपत बा. चौधरी, श्री. विलास सखाराम चौधरी, श्री सुरेश सखाराम चौधरी, श्री. प्रकाश विष्णु चौधरी व श्री समिर मधुकर चौधरी यांनी जमिन विनामुल्य देणगी स्वरुपात दिली. कार्यक्रमाचे निवेदन सौ. हर्षला म्हात्रे (वेढी) यानी केले.
सदर वास्तुचे बांधकाम व निधी संकलनासाठी उज्ज्वल मंडळाच्या कार्यकर्त्यानी अथक परिश्रम घेतले.