हार्दिक अभिनंदन
बोरीवली, मुंबईतील वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांची 14-17 डिसेंबर दरम्यान झालेल्या आठव्या जागतिक आयुर्वेद परिषदेसाठी निवड झाली. अहमदाबाद येथील गुजरात युनिव्हर्सिटी कॉन्व्हेंशन अँड एक्झिबिशन सेंटर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘Ayurvedic management of Anterior cruciate ligament injury’ या विषयावर आपला शोधप्रबंध सादर केला.
भारत सरकारचे आयुष मंत्रालय, गुजरात सरकार आणि वर्ल्ड आयुर्वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या परिषदेत जगभरातून ५००० प्रतिनिधी सहभागी झाले होते तीस सत्रांत १५० पेक्षा अधिक तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले
Anterior cruciate ligament हे गुडघ्याच्या सांध्यातील स्नायू असून त्या दुखापतीसाठी आयुर्वेदीय औषधे व पंचकर्मचिकित्सेचा प्रभावीपणे वापर करून चिकित्सा केली गेली. नव्या पिढीला आयुर्वेदाचे महत्व पटवून देण्यासाठी तसेच आयुर्वेदिक पद्धतीने गुडघ्याच्या दुखापती , संधिवात यासारख्या समस्या दूर करण्यासाठी हे संशोधन उपयुक्त ठरेल, असा विश्वास डॉ. स्निग्धा चुरी-वर्तक यांनी व्यक्त केला.
डॉ. स्निग्धा वर्तक.
समन्वय आयुर्वेदिक आणि पंचकर्म क्लिनिक.
बोरीवली, मुंबई.
समस्त सोमवंशी क्षत्रीय समाजोन्नती संघ,वाडवळ समाजबांधवाकडून कृत्तिका स्निग्धा वर्तक ह्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..!