अमन चौधरी – राष्ट्रीय प्रतिभा क्रिडा सेवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
५ व्या अखिल भारतीय प्रतिभा संमेलनात विरारच्या अमन चौधरीचा गौरव,देशभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी करणा-या १०० गुणवंतांचा गोव्यात सत्कार…..
कला, पर्यटन, सांस्कृतिक, साहित्य, सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रतिष्ठेचा मानला जाणारा साहित्य मानवसेवा परिषदेचा २०१८ या वर्षासाठीचा पुरस्कार रवींद्र भवन नाट्यगृह वास्को-गोवा येथे आयोजित ५ व्या अखिल भारतीय प्रतिभा संमेलनाच्या व्यासपीठावरून मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवारी प्रदान करण्यात आले.देशभरातील निवडक १०० प्रतिभावंतांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
गोवा – महाराष्ट्र अंतर्गत शासन मान्यता प्राप्त मानवसेवा विकास फाउंडेशन, कला पर्यटन सांस्कृतिक महोत्सव समिती, मानवसेवा साहित्य अकादमी महाराष्ट्र, कला सप्तसूर संस्था गोवा आणि जीवन ज्योती प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. राष्ट्रीय व राज्य स्तरीय पातळीवरील पुरस्कार विजेत्यांमध्ये गोमंतकीय सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक व पत्रकारितेसह इतर सर्वच क्षेत्रात विशेष कार्य करणा-यांचा गौरव करण्यात आला.
विरार येथे राहणारे अमन चौधरी आंतरराष्ट्रीय अॅथलेटीकपटू आहेत.राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अॅथलीट स्पर्धेत त्यांनी दैदिप्यमान कामगीरी केली आहे.गरीब व गरजू विद्यार्थी व खेळाडूंसाठी ते विनामूल्य खेळाचे प्रशिक्षण देतात. इंडिया मास्टर अॅथलेटीक्स ऑफ महाराष्ट्र या संघटनेचे ते सदस्य असून पालघर जिल्हा अॅथलेटीक्स असोसिएशनचे सहसचिव आहेत.अनेक पुरस्कार त्यांना मिळाले असून त्यात ठाणे जिल्हा पोलीस क्रिडा पुरस्कार,गोखले एज्युकेशन नाशिक क्रीडा पुरस्कार,शिवसन्मान सोहळा क्रिडा पुरस्कार तसेच स्थानिक पातळीवर अनेक पुरस्कार त्यांनी प्राप्त केले आहेत.त्यांच्या या उल्लेखनीय कामगीरीबद्दल त्यांना ‘राष्ट्रीय प्रतिभा क्रिडा सेवारत्न पुरस्काराने’सन्मानित करण्यात आले.
Abhinandan
Congratulations
Congratulations Aman dada.
अभिनंदन 💐
Congratulations,
congratulation dada
💐💐💐💐Congratulations Aman Dada……..
अभिनंदन अमन
अभिनंदन
Congratulations Aman Da
अभिनंदन अमन
Congretts Aman