comment Add Comment
Posted on Last updated

फेसबुक फेवर…!!!

(बंडू काका आज हात पाय आदळतच घरात आले.)
बंडू काका :खायला काळ आणि भुईला भार झालीये कूचकामी कुठली….सतत “फेस भूक”,”फेस भूक” आणि “फेस भूक” बास्स झाल..कहरच झाला आता. आतल्या खोलीत बसलेली चिनू बाबांचा हा आकस्मिक राग पाहून आपण पकडलो गेलो या भीतीने अगदी कावरी-बावरी झाली.
एवढ्यात स्वयंपाक घरात भाजी चिरत बसलेल्या रमा काकू फिदी-फिदी हसत म्हणाल्या अहो काय हे…आधी नीट बोला तरी …”फेस भूक”,”फेस भूक” काय लावलय “फेसबुक” म्हणा “फेसबुक” ह्म्म्म.
बंडू काका : अग मी त्या फेसबुकबद्दल बोलत नाहीये … मी आपल्या म्हशीच्या सगुणेच्या नावाने लाखोल्या वाहतोय “दुध काही देत नाही उगीच आपल तोंडाला फेस आणून भूक लागल्याच ढोंग करते”.
आणि सुटकेचा निश्वास टाकीत चिनूने बंडू काकांची कमेंट लाईक करून त्यावर स्वतःची कमेंट दिली … हा… हा… हा.
– कु.भावेश वर्तक. ( काही चुका असल्यास जरूर निदर्शनास आणा,तुमच्या सूचनांचे स्वागत आहे. )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *