एकदा तरी असे घडावे
एकदा तरी असे घडावे
स्वप्नातले सारे काही सत्यात घडावे,
एकदा तरी असे घडावे
माझे तुझ्यावरचे प्रेम तुला कळावे,
एकदा तरी असे घडावे
सांजवेळी तू यावे आणि हळूच कानात गुणगुणावे,
एकदा तरी असे घडावे
माझे नाव तुझ्या मुखी यावे,
एकदा तरी असे घडावे
तू येता समोर मीही सारे काही खुलून बोलावे,
एकदा तरी असे घडावे
माझे मन तू न सांगताच वाचावे,
एकदा तरी असे घडावे
कधीतरी माला भेटण्यासाठी बहाने तूही करावे,
एकदा तरी असे घडावे
तू असता सोबती वेळेनेही थोड़ेसे थांबावे,
एकदा तरी असे घडावे
तुझ्या मिठित असताना जग हे मी सोड़ावे………..
रचना: कु.राजस्वी विजय राऊत.