comment 4 Comments
Posted on Last updated

नंदादेवी एक साहसी अनुभव – हर्षाली वर्तक

नंदादेवी एक साहसी अनुभव…. ….. हर्षाली वर्तक
(भाग पहिला)
——————————————————————/——————
नंदादेवी शिखर निवडण्या पाठी माझा उद्देश काही वेगळा होता, भारता मधील सर्वोच्च अश्या तीनही शिखरे जवळून पहायची असा काही सा माझा मानस होता , कांचनजंगा हे भारतातील सर्वाधीक उंची चे शिखर मी जवळून 2009 ला पाहिले आता दुसऱ्या नंबर चे पीक , आणि ते आहे नंदादेवी…. परंतु हा खूप रेयर ट्रेक असल्याने मला खुप ठिकाणी माहीत काढून पण हवे तसे काही मिळत नव्हते ,त्यात नंदादेवी चा परिसर अभयारण्य म्हूणुन त्याची परमिशन सुद्धा मिळत नव्हती,जवळ जवळ या साठी मी 5/6 महिने प्रयत्न करत होती, त्यात ( Himalayan Climber https://www.himalayanclimber.com/
नीरज जोशी ) यांची ओळख झाली त्यानी मला मार्च चा महिना संपता संपता ऐक फोन केला तुम्ही आमच्या कडे नंदादेवी ची चौकशी केली होती…मी हो म्हणाली आणि सोमोरून योग आला परंतु इतक्या अडचणीना मला सामोरे जायचे होते हे तेव्हा माहीत नव्हते…नीरज ने दिलेल्या माहिती नुसार महाराष्ट्र ची एक टीम 12 जणाची येणार होती मी त्याना जॉईन होऊ शकते असे तो बोलला मी म्हटलं अरे पण महाराष्ट्र खूप मोठे आहे नक्की कुठले उत्तर आले पुणे मी ठीक असे उत्तर दिलं, पुढं शोध मोहीम सुरू झाली कोण आहेत पुणे चे आणि किती मुली आहेत …तेव्हा समजले ऐक सुद्धा मुलगी नाही .. आता काय करायचे… मी परत नीरज ला फोन फिरवला… आणि विचारले अरे पण एक सुध्दा मुलगी नाही मग कसे काय ?…. त्याने विचारले मग मी काही करू शकतो का मी म्हटलं हो जर मला एकटी साठी एक टेंट मिळणार असेल तरच मी फायनल करते… त्याचे लगेच उत्तर आले हो नक्की मिळेल.. आणखी काही वेगळे पाहिजे असेल तरी आम्ही देऊ… माझ्या चेहऱ्यावर पुन्हा एक सुंदर स्मित हास्य आले… आणि पुढच्या तयारी ला लागले या सगळ्या मध्ये एप्रिल सुरू झाला मे साठी सगळे सुट्टी निमित्त बाहेर फिरायला जातात त्या मुळे ट्रेन बुकिंग फुल्ल जेम तेम प्लेन चे बुकिंग झाले, शेवटच्या क्षणी झाले त्यामुळे थोडे जास्तीच महाग पडले पण त्या मोउंटन साठी काही पण,मुंबई -दिल्ली प्लेन आणि पुढे दिल्ली- कथगोदम ट्रेन बुकिंग केले पण ते सुद्धा वेटींग होते… होईल तो परेत असा विचार केला ….
दिनांक 13 मे दुपारी 3:15 चे प्लेन मुंबईत ,मी वेळेवर पोहचली सगळे वेळेत चालू होते…प्लेन वेळेत निघाले आणि मी स्वतःला संगीतले लवकरच येते तुला भेटायला, खूप आतूर होती आणि नेहमीच असते.
परंतु आता बहुतेक तो (मोउंटन) माझी परीक्षा घेणार असल्याची पुसट सुध्दा कल्पना मला नव्हती…वातावरण खराब झाल्या मुळे विमान दिल्ली ला उतरवता येत नाही अशी सूचना झाली आता थोडे टेंनशन आले करण माझी रात्री 10 ची राणीखेत एक्सप्रेस ची ट्रेन होती आणी बाकी सगळा ग्रुप तिथेच (दिल्ली)भेटणार होता…खुप वेळ विमानात बसून होते, नंतर त्यानी विमान अमृतसर च्या ऐअरपोर्ट वर उतरवले, जवळ जवळ आम्ही सगळे प्रवासी 3 तास तिथेच होते आता सगळयांनची चिडचिड सुरू झाली, माझा ऐक मित्र (प्रसाद सोमण Prasad Soman )दिल्ली च्या विमानतळ वर होता अमृतसर वरून मी त्याला फोन फिरवला, तिथे काय चालू आहे? तो म्हणाला 3 तास झाले 1 सुध्दा विमान येत नाही जात नाही… आता माझं पण थोडे टेन्शन वाढू लागले…असं करत करत रात्री आम्ही सगळेच प्रवासी रात्री 12:30 ला दिल्ली विमानतळा वर पोहचलो…त्यात सागर Sagar Bhalerao चा फोन आला इथे स्नो स्टॉर्म चालू आहे आम्ही रूपकुन ट्रेक पुर्ण करू शकले नाही तू जमत असेल तर परत मुंबई ला जा (काळजी पोटी) ….पण आता पुढे काय? ….मी ऐकटी विमानतळा वर काय करायचे ट्रेन ऐक तास लेट झाली पण आता ती सुद्धा निघून गेली होती(राणीखेत एक्सप्रेस). दिल्लीत मी एकटी रात्री ची वेळ काय करू समजत नव्हते…. परत मुंबई गाठायची तरी प्लेन बुकींग पासून सुरू करावे लागेल, समान कार्गो मधून घेतले आणि त्याच ट्रॉली वर 10मी शांत बसली, ताई ला फोन केला आणि दिल्ली मध्ये राहत असलेल्या अर्पण गर्ग Arpan Garg मित्रा ला फोन केला तो नोकरी निमित्त दिल्ली मध्ये राहत नाही पण त्याची फॅमिली मात्र असते, त्यानी सकाळी काही ते डिसिजन घे असे सांगितले पण आता माझ्या घरी प्रीतम पुरा ला जा असे संगितले त्यानी त्याच्या घरी फोन करून मी येते याची कल्पना दिली आणि मी एअर पोर्ट वरून रात्री 2 ला taxi बुक केली त्यानी त्याच्या घरचे लोकेशन गुगल वर पाठवले gps on केला आणि गाडी मध्ये बसली त्याचे सतत फोन चालू होते कुठेपोहचली त्याचे बाबा रोड वर येऊन माझी वाट पाहत होते त्याना पाहून सुटकेचा निश्वास सोडला त्यांच्या घरी सगेळेच जागे होते त्याची बहीण स्वाती, आई आणि बाबा जवळ जवळ पाहाटेचे 3 वाजले होते, सगळे माझी वाट पाहत होते याचे खूप आचार्य वाटले…जेवते का असे विचारले पण पुढे काय करायचे या विचारानि भूक पण गेली होती, मी काही नको म्हणाले ,थोडे फेश होऊन झोपायला गेली पण अजून विचार चक्र चालू होते काय करता येऊ शकते, त्यातच नीरज चा फोन आला( आधी प्लेन लेट होते हे माझे बोलणं झालं होतं ….)मी विचारले जर मी उद्या सकाळी 12 परेत तिथे आले तर काही होऊ शकते का? की मी परत जाऊ, त्यानी संगेतले मी एकटा थांबू शकतो पण पूर्ण टीम नाही थांबू शकत, (राणीखेत एक्सप्रेस सकाळी 5 ला कठोगोदम ला पोहचते) वेगळी कार करून 285km चा प्रवास आपण करून रात्री परेत पोहचू शकतो.. काय करावे सुचतं नव्हते, 3:30सकाळी, नंतर मी दिल्ली बस स्टँड ला फोन केला की काही बस मिळेल का कथगोदम साठी ते म्हणाले रात्री 11 ची शेवटची बस असते आता नाही काही…. आता काय …. मुंबई मध्ये वास्तव्यस असलेल्या माझ्या एका सराना जे रेल्वे मध्ये स्टेशन मास्टर आहेत (नितीन गांधी) त्याना फोन केला नशिबाने अजून साथ सोडली नव्हती त्यांची रात्र पाळी चालू होती त्या मुळे पुढची माहिती मिळाली ..सकाळी 5 ला शताब्दी एक्सप्रेस आहे ती कठोगोदम ला सकाळी 11:30 ला पोहचते पण बुकिंग फुल्ल आहे ….थोडा विचार करून मी बुकिंग करायला संगीतले आणि जुगाड खेळायचं ठरवले हार मानेल तर ती मी काय….मुंबईत परत जायचे की एक प्रयत्न अजून करायचा….हे सगळे करताना सकाळचे 4:00 वाजले , फ्रेश होऊन चहा पिऊन मी अर्पण च्या बाबान सोबत कार मध्ये बसून old दिल्ली ला सकाळी आली ,फक्त एक PNR चा मेसेज घेऊन मी शताब्दी ट्रेन मध्ये जायचे ठरवले 80 वेटींग मध्ये माझे तिकीट होणे शक्य नव्हते म्हणून पन्ट्री बॉय शी बोलणं करून त्या ट्रेन मध्ये शिरली, मनाची तयारी केली कदाचित पुढचा प्रवास ट्रेन च्या दरवाज्यात बसून करावा लागेल, पण तशी वेळ आली नाही, टिटी ला 1500 rs देऊन मला सीट मिळाली… नशिबाने अजून साथ सोडली नव्हाती…राणीखेत एक्सप्रेस जी सकाळी 5 ला पोहचणार होती ती 4 तास लेट झाली…आणि माझी शताब्दी वेळवर होती …थोडा आनंद झाला मी सतत नीरज ला फोन करून अपडेट देत होती… बाकी सगळी टीम 9:30 च्या आस पास कथगोदम ला पोहचली माझी ट्रेन 11:30 ला पोहचणार होती मी बाकी टीम ला माझ्या साठी थांबायचे आव्हान केले परंतु टेम्पो ट्रॅव्हल्स वाला ऐकायला तयार होते नव्हता 285 km चा पुढचा प्रवास असल्याने बाकी टीम 10:30 च्या सुमारास कथगोदम वरून निघाली….माझे विचार चक्र परत सुरू झाले ….आता पुढे काय?… माझी ट्रेन 11:30 ला कथगोदम ला पोहचली… थोडे वाईट वाटले 1 तास माझ्या साठी थांबले असते तर ….असोत नीरज माझ्या साठी कथगोदम ला थांबला होता…मी नीरज ला प्रथमच पाहत होती आणि स्टेशन वर खूप गर्दी होती मी स्टेशन वर पाऊल ठेवताच सगळयांनी माझ्या भोवती गर्दी केली मॅडम काहा जाना है! मी सहज सगळे रेट विचारून घेतले आणि नीरज ला शोधले नीरज च्या 6 ft उंची मुळे मला त्याला शोधायला फार त्रास झाला नाहीं…..नीरज ला विचारले पुढे काय?… तो म्हणाला कार नि जावे लागेल 285 km मुन्शीरी ला…त्यातच मला आमच्या ग्रुप वर सगळे 12 जण नाश्ता करत असलेला फोटो आला (whatsaap) मी नीरज ला दाखवला आणि फोन करून ते कुठे आहेत ते विचारले साधारणपणे 20 km वर कथगोदम पासून पुढे ते एका हॉटेल मध्ये होते, मी नीरज ला सांगून तेथे पोहचायचे ठरवले कार बुक केली 700 rs मध्ये मला वाटले संपले आता सगळे ग्रुप सोबत जाऊ आपण ….पण….एक कार वाला आमच्या गाडी समोर येऊन उभा राहिला तुम लोग नही जा सकते…हे काय नवीन मला घाई होती कधी 20km संपतील …नीरज नि त्याची गाडी आधी सांगून ठेवली होती मुन्शीरी परेत साठी आणि आम्ही त्याच्या सोबत जात नाही so तो चिडला, नीरज नि त्याला 500 rs देऊ केले पण तो काही ऐकायला तयार होई ना त्याला पूर्ण amt(5000) पाहिजे होती शेवटी आम्ही त्याच्या गाडी मध्ये जायचे ठरवले 285 km चा प्रवास….सुरवातीला कोणी कोणाशी बोलत नव्हते….मग वातावरण निवळत गेले जेव्हा बर्फाचे डोगर खिडकीतून डोकावू लागले…. सागर आणि त्याची फॅमिली अलमोरा जवळ एका हॉटेल जवळ 2दुपारी च्या सुमारास माझी जेवणाची वाट पाहत होते ते रूपकुंड वरून परत मुंबई ला जात होते त्याच्या सोबत जेवणाचा आस्वाद घेऊन मी पुढे प्रवासाला निघाली …. साधारण रात्री 10:30 च्या सुमारास आम्ही मुन्शीरी ला पोहचलो..( THANKS TO BOTH ARPAN FAMILY & NIRAJ JOSHI FROM Himalayan Climber https://www.himalayanclimber.com/)

4 thoughts on “नंदादेवी एक साहसी अनुभव – हर्षाली वर्तक

  1. तुझ्या जिद्दीला सलाम

  2. तुझ्या जिद्दीला सलाम
    Tusi great हो

  3. Harshali, Anil Koshti here. Very nicely written article. When do I get to read part II& subsequent follow on articles? Keep up the good work. Rgds. By the way can you send me the photographs & videos of our Nandadevi Trek. Would be highly grateful.

  4. Hello madam it’s Ratan here nice to see your blogs bring English version too.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *