👫बहीण भावाचे नाते👫
बहीण भावाचे नाते नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते,
आयुष्यभर एकमेकांसोबत राहणारे असते,
बहीण भावाचे नाते काहीसे खट्याळ असते,
कधी कधी फुलासारखे कोमल असते,
बहीण भावाचे नाते अबोल असते,
न समजणारे कोडे असते,
बहीण भावाचे नाते हट्टी असते,
क्षणात कट्टी तर क्षणात गट्टी असते,
बहीण भावाचे नाते सावली देणारे झाड असते,
आयुष्याच्या वाटेवर चालताना सोबत असणारे धीराचे गाठोडे असते,
बहीण भावाचे नाते कधीही न तुटणारे असते ,
हे राखीच्या धाग्यात घट्ट बांधलेले असते,
बहीण भावाचे नाते एकमेकांशिवाय अपुरे असते,
म्हणूनच तर बहीण भावाचे नाते सागराहूनही खोल असते.
कु.राजस्वी विजय राऊत.
nice
Thank you 😃
खुपच मस्त आहे कविता तुझी. 👌😊
Thank you 😃
Hello Tai Mala tuzi help havi aahe mala help karshil ka 8087210049 ha maza Wp cha No Aahe mala msg kivha call kr