हल्ली पावसाळा सुरू झाल्याने जागोजागी ट्रेक चे पेव फुटले आहे.
खरे तर, पावसाळा हा नवख्याने ट्रेक करणाऱ्याचा सिजन नसून, हिवाळा हा बऱ्याच अंशी योग्य काळ आहे…
आपला मुलगा, मुलगी किंवा इतर कोणी नातेवाईक जर का कोणत्या ट्रेकिंगला जात असतील तर काही गोष्टी ची खातरजमा कृपया करून घ्यायालाच हवी.
१. कोणता ग्रुप आहे आणि त्यातील लीडर ने आतापर्यंत केलेले ट्रेक किती आहेत?
२. ग्रुप register आहे का?
३. त्यामध्ये अनुभवी सदस्य कोण आहेत आणि जर का काही अनुचित प्रकार घडला तर त्या प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी त्यांची कितपत तयारी आहे ते पण विचारावे.
४. जिथे जात आहोत त्या ठिकाणाबद्दल ची बऱ्यापैकी माहिती असणे
५. ट्रेकमध्ये दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन
६. मद्यपान, धुम्रपान अशा गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात
७. वेळप्रसंगी तिथे असलेल्याना किंवा अडकलेल्याना साहाय्य करावे
८. अनुचित प्रकार घडल्यास जरापण गडबडून न जाता, डोके शांत ठेवून त्या गावातील सरपंच, पोलीस याचे साहाय्य घ्यावे
गेली १० वर्षे पासून वेगवेगळ्या ग्रुप बरोबर मी स्वतः ट्रेक करत आलोय, परंतु सध्याचे ट्रेक चे हे बदललेलं (Business Mind) रूप पाहता, एक ट्रेकर म्हणून मला या गोष्टी तुम्हांसमोर नमूद कराव्याश्या वाटल्या.
कारण हे बदललेले रूप बंद होणे शक्य नाही त्यामुळे काय सुरक्षा घ्यायला हवी हे सांगणे आपले कर्तव्य आहे असे समजून मी हा मेसेज टाईप केला आहे.
कृपया आपल्या प्रियजनांच्या सुरक्षेसाठी या व अशा बऱ्याच गोष्टी आपण बाकीच्यांना पण शेअर कराव्यात जेणेकरून अनुचित प्रकार कमी होण्यास मदत होईल
धन्यवाद !!!
आतिश म्हात्रे