आठवतात का ते दिवस
लहानपणी कवलारु घरात आईवडीलान सोबत चार भांवड एकञ एका घरात आनंदाने राहत असत.
परतु आज मुलाच्या एका मोठ्या बंगल्या मध्ये आई वडीलाना राहायला जागा का पुरत नसत?
आठवतात का ते दिवस
लहानपणी बहिणी भावाच्या जिवकी प्राण असत.
परतु आज त्याच बहिणी दोन दिवसा साठी माहेरी आल्या की नकोश्या का होत असत ?
आठवतात का ते दिवस
लहानपणी एका ताटात बसुन जेवणारी एक मेकाची कापड घालणारी लेकर किती आनंदात असत.
परतु आज एका जमिनीच्या तुकड्या साठी एकमेकाच्या जिवावर का उठत असत?
आठवतात का ते दिवस
पुरवी एकञ कुंटूबाचा गाढा चालवणारी स्ञी 10/12 जणाचे काम करत कशी सुखी संसार माडंत असत.
परतु आज नवरा बायको दोघा समवेद 2 माणसाचे काम करायला का आजच्या पिढीला होत नसत?
आठवतात का ते दिवस
काबाड कष्ट करणारा आपला बाप आणि सकाळ पासुन घरात राबणारी आपली माय किती ही ञास झाला तरी राग राग न करता आपल्या मुलाना आनंदात ठेवत असत.
परतु आज कामावरुन दमुन आलेली मुल हयात माय बापावर राग राग का काढत असत?
अँड. श्वेता चौधरी (विरार)
खरोखरच आपल्या समाजतील समाज बांधवाना आपल्या आई-वडिल व भाऊ-बहिण ह्या नात्यांंचा विसर पडला आहे आणी आपन केलेल्या कवितेचा योग्य तो विचार करुन सहकार्य करती ………..
आपन आपल्या समाज बांधवानासाठी केलेली कविता खुपच सुंदर आहे.
Thanks
आजच्या समाजातील दारुण सत्य आपल्या कवितेमध्ये प्रतीबिंतीत होते पुढे अशाच प्रकारच्या लिखाणास खूप खूप शुभेच्छा
Thanks